फ्रान्स सरकारने 'या' मशिदीवर घातली बंदी, समोर आले धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 01:00 PM2021-12-29T13:00:36+5:302021-12-29T13:00:43+5:30

काही दिवसांपूर्वीच फ्रान्स सरकारने देशातील 100 मशीद आणि मुस्लिम प्रार्थना स्थळांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

France News; French government bans mosque, because its Imam giving hate speech | फ्रान्स सरकारने 'या' मशिदीवर घातली बंदी, समोर आले धक्कादायक कारण

फ्रान्स सरकारने 'या' मशिदीवर घातली बंदी, समोर आले धक्कादायक कारण

googlenewsNext

फ्रान्सच्या इमॅन्युएल मॅक्रॉन सरकारने देशाच्या उत्तरेकडील भागात असलेली मशीद बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मशिदीचे इमाम कट्टरतावादी विचारांचा प्रचार करत होते. ही मशीद पॅरिसच्या उत्तरेला सुमारे 100 किलोमीटर अंतरावर 50,000 लोकसंख्या असलेल्या बोवई शहरात आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार मशीद सहा महिने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

इमाम चुकीची शिकवण देत होता
मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीत सुमारे 400 लोक इमामचे अनुयायी आहेत. मशीद बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डरमानिने यांनी केल्यानंतर ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथील इमाम आपल्या प्रवचनांमध्ये "ख्रिश्चन, समलैंगिक आणि ज्यूंना लक्ष्य करत असल्याचे" गृहमंत्र्यांनी सांगितले. तसेच, मशिदीच्या इमामवर द्वेष, हिंसाचार आणि जिहादची शिकवण दिल्याचा आरोप आहे.

गैर मुस्लिमांना शत्रू ठरवले
एएफपी टीव्हीच्या रिपोर्टनुसार, मशीद बंद करण्याच्या अधिकृत कागदपत्रामध्ये म्हटले आहे की, इमामने जिहाद, (इस्लामच्या शत्रुंविरोधात युद्ध)ला एक 'कर्तव्य' म्हटले आणि जिहादींना इस्मामचे 'हिरो' म्हणून दाखवले. तसेच, इमामने गैर-मुस्लिमांना शत्रू ठरवले. सरकारने म्हटले की, जगभरात होत असलेल्या दहशतवादी कारवाया पाहता, ही मशीद पुढील सहा महिने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

100 मशिदींची चौकशी
काही दिवसांपूर्वीच फ्रान्सच्या गृह मंत्रालयने देशातील 2,600 पेक्षा अधिक मशीद आणि मुस्लिम प्रार्थना स्थळांपैकी 100 चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या ठिकाणांमधून कट्टरतावादी विचार पसरवल्याचा संशय सरकारला होता. याच पार्श्वभूमीवर या मशिदीवर पुढील सहा महिने बंदी घालण्यात आली आहे.

Web Title: France News; French government bans mosque, because its Imam giving hate speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.