फ्रान्समध्ये कोरोनाचे ५,४०० बळी; नर्सिंग होममध्ये झालेल्या मृत्यूंमुळे आकडा आणखी वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 02:07 AM2020-04-04T02:07:51+5:302020-04-04T06:30:22+5:30
बाधितांवर उपचार करता यावा म्हणून आवश्यक औषधे तसेच उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे.
पॅरिस : फ्रान्समध्ये कोरोनामुळे घेतलेल्या बळींची संख्या गुरुवारी ५,४०० हून अधिक झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने येथील नर्सिंग होममध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही मोजण्यास सुरुवात केल्याने या संख्येत मोठी भर पडलेली दिसते.
आरोग्य विभागाच्या अधिकाºयाने माहिती दिली की, कोरोनाच्या एकूण बळींची संख्या गुरुवारी ४,५०३ इतकी होती. ही संख्या आधीच्या दिवशीच्या बळींच्या ४,०३२ या आकड्याच्या १२ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले; परंतु येथील इतर नर्सिंग होम आणि अन्य हॉस्पिटलमध्ये झालेल्या ८८४ मृत्यंूची नोंद जमेस धरल्यास हा आकडा ५,३८७ इतका होतो. बुधवारच्या एकूण बळींच्या तुलनेत हा आकडा १,३५५ ने अधिक आहे. ही बेरीज करताना देशातील इतर ७,४०० नर्सिंग होममध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची नोंद उपलब्ध झाली नव्हती. कोरोनामुळे फ्रान्स अभूतपूर्व अशा गंभीर संकटाला तोंड देत आहे.
बाधितांवर उपचार करता यावा म्हणून आवश्यक औषधे तसेच उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. युरोपमध्ये इटली, स्पेन तसेच अन्य देशांमध्ये कोरोना संसर्गाने गंभीर परिस्थिती उद्भवल्याने औषधे उपलब्ध करून देणे जिकिरीचे बनत चालले आहे. अनेक नर्सिंग होममध्ये काम करणाºया कर्मचाऱ्यांमुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे याठिकाणी सर्व कर्मचाºयांची कोरोना चाचणी केली जात आहे. (वृत्तसंस्था)
वृद्धांची विशेष काळजी घेणार
ंफ्रान्समध्ये जवळपास १० लाख लोक वृद्धांसाठी असलेल्या आश्रमांमध्ये राहतात. वयोवृद्धांमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याने या लोकांची विशेष काळजी घेतली जात आहे, असे अशा प्रकारच्या आश्रमांच्या संघटनेचे प्रमुख रोमेन गिझोल्म यांनी सांगितले. कोरोनाबाधित रुग्णांना लाईफ सपोर्टची गरज पडण्याचे प्रमाण सध्या ६ टक्क्यांनी वाढल्याची माहिती त्यांनी दिली.