कोरोनाला कमी समजणं या 'अंडरटेकर'ला पडलं महागात, ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 03:06 PM2021-12-28T15:06:44+5:302021-12-28T15:08:59+5:30
Frederic Sinistra Death : तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं.
Frederic Sinistra Death : तीनवेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला फ्रेडरिक सिनिस्ट्राचं वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झालं. फ्रेडरिक सिनिस्ट्राला अंडरटेकर नावानेही ओळखलं जात होतं. फ्रेडरिक सिनिस्ट्राला कोरोनाची (Corona Virus) लागण झाली होती आणि त्याने हट्टाने ठरवलं होतं की, तो त्याच्या शारीरिक शक्तीने कोरोनाला मात देईल. एकप्रकारे फ्रेडरिकने कोरोनाला खुलेआम आव्हान दिलं होतं. पण ते त्याला महागात पडलं.
कोरोनाला हलक्यात घेणं पडलं महागात
फ्रेडरिक सिनिस्ट्राने त्याच्या हट्टापाई वॅक्सीन घेतली नव्हती. फ्रेडरिक आधीपासूनच कोरोनाच्या गाइडलाईन फालतू असल्याचं सांगत त्या फॉलो करण्यास नकार देत होता. याच कारणाने त्याने ओव्हर कॉन्फिडन्समध्ये कोरोनाची वॅक्सीनही घेतली नव्हती. कोरोना व्हायरस आणि वॅक्सीनबाबत अनेक लोकांप्रमाणे हे मानत होते की, हा केवळ एक खेळ आहे आणि शरीराने मजबूत असलेल्या लोकांवर अशा अफवांचा काहीच परिणाम होत नाही.
फ्रेडरिक सिनिस्ट्रा गमतीत असंही म्हणत होता की, जर कोरोनासोबत त्याला दोन हात करावे लागले तर तो त्याच्या शारीरिक शक्तीने त्याला मात देणार. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना गाइडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या या शक्तीशाली व्यक्तीला नोव्हेंबरमध्ये कोरोनाची लागण झाली होती.
ओव्हर कॉन्फिडन्समुळे गेला जीव
कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने दिवसेंदिवस फ्रेडरिकची तब्येत अधिक बिघडत गेली. अखेर त्याची तब्येत इतकी बिघडली की, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आणि उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.
फ्रेडरिकला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं तेव्हा त्याची तब्येत इतकी बिघडली होती की, त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल करतानाही त्याला स्वत:वर विश्वास होता आणि आपल्या फॅन्सना तो म्हणाला होता की, या आजारावर मात करून तो लवकरच आपल्या लोकांमध्ये परत येईल. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी हे मानायलाच तयार नव्हती की, तिच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.