या देशात तरूणांना आता मोफत वाटले जाणार कंडोम, अल्पवयीन मुलांचाही यात समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 10:00 AM2023-01-06T10:00:40+5:302023-01-06T10:00:47+5:30
France : फ्रान्सच्या सरकारने ही नवीन हेल्थ सेवा सुरू केली जेणेकरून देशातील तरूणांमध्ये लैंगिक संक्रमण आजार पसरू नये. सरकारची ही नवीन सुविधा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आली आहे.
France : फ्रान्सच्या सरकारने तरूण आणि महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. सरकारचं मत आहे की, आता महिला आणि पुरूषांना औषधाच्या दुकानांवर मोफत कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातील. पण ही मोफत सेवा केवळ 26 वय होईपर्यंतच मिळणार आहे. अल्पवयीनांचाही यात समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रो यांनी ही एक छोटी क्रांती असल्याचं म्हटलं.
फ्रान्सच्या सरकारने ही नवीन हेल्थ सेवा सुरू केली जेणेकरून देशातील तरूणांमध्ये लैंगिक संक्रमण आजार पसरू नये. सरकारची ही नवीन सुविधा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आली आहे. याची घोषणा सरकारकडून डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. सीएनएनच्या एका वृत्तानुसार, आधी या नियमानुसार 18 ते 25 वयोगटातील तरूणांना ही सुविधा देण्याचं ठरलं होतं. पण आता यात अल्पवयीनांचाही समावेश करण्यात आला आहे. सरकारने सांगितलं की, महिलांना मोफत गर्भनिरोधक औषधे मिळतील.
यासोबतच 1 जानेवारीनंतर महिला डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भनिरोधक औषधे घेऊ शकतील. महिलांनी सेवेचा लाभ घेणंही सुरू केलं आहे. हा निर्णय अशावेळी घेण्यात आला जेव्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अंदाज लावला की, फ्रान्समध्ये 2020 ते 2021 दरम्यान एसटीडी म्हणजे लैंगिक आजार 30 टक्के वाढले.