दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 11:06 AM2020-06-14T11:06:18+5:302020-06-14T12:58:27+5:30
यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून दक्षिण कोरियाने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे.
सेऊल : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन गेल्या 2महिन्यांपासून गायब आहे. त्याच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे उत्तर कोरियाकडून व्हिडीओ प्रसिद्ध करून जिवंत असल्याचे साऱ्या जगाला भासविण्यात आले आहे. मात्र, सध्या देशाचा कारभार त्याची बहीण आणि उत्तराधिकारी समजली जाणारी किम यो जोंग ही पाहत आहे. तिने आजच दक्षिण कोरियाला सैन्य कारवाईची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.
यो जोंगने दक्षिण कोरियाला हल्ल्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली असून दक्षिण कोरियाने लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. यो जोंगने द. कोरियाला शत्रू राष्ट्र म्हटले आहे. तसेच पुन्हा धमकी देत हल्ला करण्याचे वक्तव्य केले आहे. दक्षिण कोरिया लवकरच सीमेवरील बिनकामाच्या संपर्क कार्यालयाच्या बंद होण्याचा साक्षीदार बनणार आहे. आता मी दक्षिण कोरियाविरोधातील कारवाईचे अधिकार सैन्य दलावर सोपवत असल्याचे, जोंग म्हणाली.
सर्वोच्च नेता, आपला पक्ष आणि देशाकडून देण्यात आलेल्या अधिकार आणि ताकदीचा वापर करून शस्त्रागाराच्या विभाग प्रमुखाला मी असे आदेश देत आहे की, दक्षिण कोरियावर जोरदार कारवाई करण्यात यावी, असे किम यो जोंग हिने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे यो जोंग ही किम जोंग उनची सर्वात विश्वासू आणि दक्षिण कोरियाशी संबंध ठेवण्याच्या निर्णय प्रक्रियेची प्रमुख आहे. य़ामुळे तिचे या हल्ले करण्याच्या आदेशामुळे दक्षिण कोरियामध्ये खळबळ उडाली आहे.
काय आहे नवा वाद?
दोन्ही देशांदरम्यानचे संपर्क कार्यालय कोरोना व्हायरसमुळे गेल्या जानेवारीपासून बंद आहे. 2018 मध्ये जोंग उन आणि द. कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जेऊ यांच्यामधील तीन बैठकांनंतर संपर्क कार्यालये बनविण्यात आली होती. दक्षिण कोरियाने सीमेवर बदनामीकारक व विरोधात पत्रके वाटल्यामुळे उत्तर कोरियाने गेल्याच आठवड्यात मोठा निर्णय घेतला होता. उत्तर कोरियाने या शत्रू देशाशी सैन्य आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. कोरियाच्या केंद्रीय वृत्तवाहिनीनुसार उत्तर कोरियांच्या सीमेवर त्यांच्या विरोधात पत्रके वाटण्यापासून दक्षिण कोरियाने या लोकांना रोखले नाही. यामुळे किम जोंग उनने याची कडक शब्दांत निंदा केली असून दक्षिण कोरियाविरोधात कठोर कारवाई केली आहे. मंगळवारपासून यावर पाऊल उचचले जाणार असून दोन्ही देशांदरम्यानच्या संपर्क कार्यालयातील संचार लाईन आणि राष्ट्रपती कार्यालयातील हॉट लाईन बंद करण्यात येणार आहे. उत्तर कोरियाचे नागरिक द. कोरियाच्या अधिकाऱ्यांच्या विश्वासघातकी वागण्यामुळे खूप नाराज आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला
CoronaVirus: देश हादरला! गेल्या २४ तासांत विक्रमी रुग्ण सापडले; अमित शहा कार्यरत
महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन आयसीयूमध्ये; कोरोना टेस्ट निगेटिव्ह
मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती
आजचे राशीभविष्य - 14 जून 2020; मकर राशीच्या व्यक्तींना प्रिय व्यक्ती भेटेल