फ्रान्सला मोठे यश! मालीमध्ये आफ्रिकेतील अल कायदाचा प्रमुख ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 04:51 AM2020-06-06T04:51:06+5:302020-06-06T04:51:57+5:30
२०१३ पासून मालीमध्ये हजारो फ्रान्सचे सैनिक तैनात आहेत. ते आयएसआयएसविरोधात लढत आहेत.
पॅरिस : दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये फ्रान्सला मोठे यश मिळाले आहे. मालीमध्ये उत्तर आफ्रिकेचा अल कायदाचा प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलला ठार करण्यात आले आहे.
फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगितले की, या मोहिमेमध्ये आयएसआयएसच्या एका मोठ्या दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हे दहशतवादाविरोधात मोठे यश आहे. आमचे सैन्य यापुढेही कारवाई सुरु ठेवणार आहेत. २०१३ पासून मालीमध्ये हजारो फ्रान्सचे सैनिक तैनात आहेत. ते आयएसआयएसविरोधात लढत आहेत.
French forces have killed al Qaeda’s North Africa chief Abdelmalek Droukdel in northern Mali, Armed Forces Minister Florence Parly (in file pic) said on Friday: Reuters pic.twitter.com/vKA12lMHl1
— ANI (@ANI) June 5, 2020
अब्देलमालेक कोण होता?
अल कायदाच्या इस्लामिक मगरेबचा म्होरक्या अब्देलमालेक हा उत्तर अमेरिकेमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या सर्व मोहिमा राबवत होता. याचबरोबर जमात नुसरत अल इस्माल वल मिस्लिमिनचे नेतृत्वही करत होता. त्याने अफगाणिस्तानमध्ये युद्धही केले होते. 2012 मध्ये त्याला अल्जेरियाच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. अनेक बॉम्ब हल्ल्यांमागे त्याचा हात होता. 2007 मधील बॉम्बस्फोटामध्ये २२ लोक मारले गेले होते.