Video: 'एक साथ नमस्ते'; भारतीय संस्कृतीतील संस्कार असलेल्या 'नमस्कारा'ची जादू सातासमुद्रापार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:26 PM2020-08-21T15:26:25+5:302020-08-21T15:46:46+5:30
कोरोनाच्या संकटात सध्या सर्वच जण शेकहँड करण्याऐवजी नमस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत.
जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर सात लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करून एकमेकांशी संवाद साधला जात आहे. अभिवादन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय अंमलात आणले जात आहे. कोरोनाच्या संकटात सध्या सर्वच जण शेकहँड करण्याऐवजी नमस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत.
सातासमुद्रापारही कोरोनाच्या या संकटात 'नमस्ते'ची जादू पाहायला मिळाली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी जर्मनीच्या चान्सलरचं भारतीय पद्धतीनं जोरदार स्वागत केलं आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी भारतीय पद्धतीने नमस्कार करत एकमेकांना अभिवादन केलं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत.
Willkommen im Fort de Brégançon, liebe Angela! pic.twitter.com/lv8yKm6wWV
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) August 20, 2020
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रो यांनी स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. अल्पावधीतच हा व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय झाला आहे. इमॅन्यूअल मॅक्रो यांनी अँजेला मर्केल यांचं भारतीय पद्धतीने नमस्कार करून स्वागत केलं. त्यानंतर मर्केल यांनीदेखील मॅक्रो आणि त्यांच्या पत्नीला नमस्कार केल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
CoronaVirus News : लस तयार झाल्यानंतर सुरुवातीला ती 'या' लोकांना दिली जाणार?https://t.co/ig50fYOWZi#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronavirusVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2020
फ्रान्सचे राष्ट्रपती आणि जर्मनीच्या चान्सलर यांनी या भेटीदरम्यान सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं आहे. नमस्कार करण्याच्या भारतीय संस्कृतीचं जगभरात कौतुक होत आहे. अनेक देशातील नेते मंडळींनी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी कोरोनाच्या संकटात भारतीय पद्धत अवलंबली आहे. हजारो लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला असून त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात 'तो' मदतीसाठी सदैव तत्पर, काम पाहून तुम्हीही कराल भरभरून कौतुकhttps://t.co/trG5kbEPxw#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) August 21, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कडक सॅल्यूट! ...म्हणून हा चहावाला करतो कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
विकृतीचा कळस! 16 वर्षीय मुलीवर 30 जणांनी केला बलात्कार
सुशांतच्या संपत्तीचा वारस ठरला! वडिलांनी घेतला 'हा' मोठा निर्णय, म्हणाले...
तेलंगणातील हायड्रो प्रोजेक्टमध्ये भीषण आग, 9 जण अडकल्याची भीती
"येत्या 6-7 महिन्यांत देश तरुणांना रोजगार देऊ शकणार नाही", राहुल गांधींचा हल्लाबोल
"4 महिन्यांत गेल्या 2 कोटी लोकांच्या नोकऱ्या, 2 कोटी कुटुंबांचं भविष्य अंधारात"