वादग्रस्त सीमा मुद्यावर चीनसोबत मैत्रीपूर्ण चर्चा

By admin | Published: June 9, 2014 04:26 AM2014-06-09T04:26:48+5:302014-06-09T04:26:48+5:30

वारंवार होणाऱ्या घुसखोरीमुळे चीनशी संबंध टोकाचे ताणले गेले असताना, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रविवारी वादग्रस्त सीमा मुद्यासह द्विपक्षीय मुद्यांवर मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा

Friendly discussion with China on the controversial border issue | वादग्रस्त सीमा मुद्यावर चीनसोबत मैत्रीपूर्ण चर्चा

वादग्रस्त सीमा मुद्यावर चीनसोबत मैत्रीपूर्ण चर्चा

Next

नवी दिल्ली : अलीकडच्या काळात वारंवार होणाऱ्या घुसखोरीमुळे चीनशी संबंध टोकाचे ताणले गेले असताना, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने रविवारी वादग्रस्त सीमा मुद्यासह द्विपक्षीय मुद्यांवर मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा करीत नवे पर्व सुरू झाल्याचे संकेत दिले आहेत. रालोआ सरकारची स्थापना होऊन अवघे दोन आठवडे झाले असताना, चीनसोबत संबंध बळकट करण्याच्या दिशेने हे ठोस पाऊल मानले जाते.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण मुद्यांवर रविवारी तीन तास केलेली चर्चा सार्थकी लागल्याचा दावा करण्यात आला आहे. सीमावाद, सीमेवरील घुसखोरी, भारतीयांना विशेष व्हिसा, ब्रह्मपुत्रा नदीवर धरणाची निर्मिती, चीनमधील वाढती गुंतवणूक अशा मुद्यांवर चर्चेत भर देण्यात आला. वांग हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे विशेष दूत म्हणून भारतात आले आहेत. भारतातील नवे सरकार प्राचीन सभ्यतेत नवे चैतन्य आणेल, अशी आशा वांग यांनी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाची भारतातील घडामोडींकडे बारीक नजर आहे.
आज मोदींना भेटणार
रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचलेले वांग सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करतील.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Friendly discussion with China on the controversial border issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.