मित्र प्रेमात पडला म्हणून मित्रांनीच घातलं श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 04:21 PM2017-06-06T16:21:39+5:302017-06-06T16:21:39+5:30

एखाद्या मित्राची आठवण काढण्याची ही अनोखी पद्धत मित्रांनी शोधून काढली आणि सोशल मीडियावर शेअर केली

Friends Shraadh Shraddha | मित्र प्रेमात पडला म्हणून मित्रांनीच घातलं श्राद्ध

मित्र प्रेमात पडला म्हणून मित्रांनीच घातलं श्राद्ध

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - आयुष्यात आपण कितीही मोठे झालो तरी एक गोष्ट नेहमी गरजेची असते ते म्हणजे मित्र. मित्र नसतील तर जगण्याला काहीच अर्थ नाही. कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं श्रेष्ठ ठरतं. पण अनेकदा आपल्या आयुष्यात असे काही मित्र असतात ज्यांना पाहून असे मित्र असण्यापेक्षा शत्रु असलेले बरे असं वाटत असतं. असं वाटण्यामागे आपला काही राग नसतो. पण काही मित्र खरंच इतका त्रास देतात की तू का आलास माझ्या राशीला असा प्रश्न पडतो. पण खरं सांगायचं तर याच मित्रांमध्ये आयुष्यातील अत्यंत सुखाचे क्षण, आठवणी मिळतात. 
 
कॉलेजमध्ये किंवा त्यानंतर तुमच्या ग्रुपमधील एक मित्र जर अचानक प्रेमात पडला असं कळालं तर सुरुवातीला सगळेजण त्याचं अभिनंदन करतात. पण मग तो व्यस्त होतो, त्याला आपल्यासाठी वेळ मिळत नाही, तो दरवेळी टाळाटाळ करु लागतो...मग आपण म्हणतो हा प्रेमात पडला नसता तर बरं झालं असतं. 

 

Web Title: Friends Shraadh Shraddha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.