पायऱ्यांपासून बाथरुमपर्यंत केवळ मृतदेहच-मृतदेह...; भयावह होतं दहशतवादी हल्ल्यानंतर मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलचं दृश्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 06:46 PM2024-03-24T18:46:27+5:302024-03-24T18:49:26+5:30
मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या हल्लायाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. रशियात 2004 नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि शेकडो लोक रुग्णालयात मृत्यूला झुंज देत आहेत.
रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रोकस हॉलचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. येथे गोळीबाराबरोबरच आग लागल्याने लोकांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा इमारतीतच होरपळून मृत्यू झाला. इमारतीच्या वेगवेगळ्या भागांत त्यांचे मृतदेह सापडत आहेत. अगदी बाथरूमपासून ते पायऱ्या आणि कॉरिडोरपर्यंत ठिक-ठिकाणी होरपळलेले मृतदेह सापडत आहेत. या हल्ल्याचा एक नवा व्हिडिओही थरकाप उडवणार आहे. तसेच हल्ल्यानंतरचे फोटोही भयावह आहेत.
मॉस्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या या हल्लायाने संपूर्ण जगाला हादरा दिला आहे. रशियात 2004 नंतर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि शेकडो लोक रुग्णालयात मृत्यूला झुंज देत आहेत. रशियातील बेसलान शाळेत 2004 मध्ये असाच हल्ला झाला होता. मॉस्कोतील हल्ल्यानंतर शनिवारी मॉस्कोचेगव्हर्नर अँड्रे व्होरोब्योव यांनी घटना स्थळाची पाहणी केली.
चार हल्लोखोरांसह 11 जणांना अटक -
रशियन माध्यमांनी हल्लेखोरांचे फोटो जारी केले असून ते परदेशी भाषा बोलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी 5 दिवसांपूर्वीच पाचव्यांदा रशियाची धुरा आपल्या हाती घेतली आहे. यामुळे हा हल्ला त्यांच्या सरकारलाही हादरा देणार आहे. घटनेत्या दुसऱ्या दिवशी रशियन पोलिसांनी चार हल्लेखोरांसह 11 जनांना अटक केल्याचा दावा केला आहे.
या हल्लेखोरांना यूक्रेन आणि बेलारूसच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे. हे हल्लेखोर युक्रेन बॉर्डरकडेच पळण्याच्या प्रयत्नात होते. रशियाच्या फेडरल सिक्योरिटी सर्व्हिसनुसार, या हल्लेखोरांचा यूक्रेनसोबत संपर्क होता. दरम्यान, आपला या हल्ल्याशी कसल्याही प्रकारचा संबंध नसल्याचे युक्रेनने निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे. या हल्ल्यानंतर, आयएसआयएस खुरासानने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
रशियातील दहशतवादी हल्ले -
- 2002 : मॉस्कोच्या दुब्रोवका थिएटरमध्ये 40 ते 50 सशस्त्र चेचेन्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात 170 जण ठार झाले होते.
- 2006 : बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात 13 जणांचा मृत्यू.
- मार्च 2010 : माॅस्कोच्या मेट्रो स्थानकांत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 38 जण ठार झाले होते.
- ऑक्टोबर 2015 : रशियन विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात 224 जणांचा मृत्यू झाला होता.