राष्ट्राध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी मोर्चा

By Admin | Published: March 16, 2015 11:47 PM2015-03-16T23:47:08+5:302015-03-16T23:47:08+5:30

लाखो लोकांनी ब्राझीलमध्ये निदर्शने केली. पेट्रोब्रास नामक तेल कंपनीत झालेल्या कथित भ्रष्टाचारात रौसेफ सहभागी असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

Front for the lifting of the President | राष्ट्राध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी मोर्चा

राष्ट्राध्यक्षांच्या उचलबांगडीसाठी मोर्चा

googlenewsNext

ब्राझिलिया : राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांना पदच्युत करण्याची मागणी करीत लाखो लोकांनी ब्राझीलमध्ये निदर्शने केली. पेट्रोब्रास नामक तेल कंपनीत झालेल्या कथित भ्रष्टाचारात रौसेफ सहभागी असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
रौसेफ ‘पेट्रोब्रास’च्या प्रमुख असतानाच कंपनीत सर्वाधिक भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा दावा आहे. मात्र, राष्ट्राध्यक्ष दिल्मा रौसेफ यांनी भ्रष्टाचारात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. अ‍ॅटॉर्नी जनरलच्या तपासातही त्या निर्दोष आढळल्या होत्या. कथितरीत्या लाच घेतल्याच्या अधिकतर प्रकरणात सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची संख्या लक्षणीय आहे.
सर्वसामान्य जनतेने हे आंदोलन उभे केले आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. कारण त्यांना हिंसा नको, भ्र्रष्टाचार, कुशासन यांचा कंटाळा आला आहे. त्यांना एक नवा ब्राझील हवा आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलक महिलेने व्यक्त केली. दरम्यान, सरकारने जनउद्रेकानंतर देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्षांविरोधात मोर्चा काढला असतानाच रौसेफ यांच्या समर्थनार्थही लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. पाच महिन्यांपूर्वीच येथे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली होती.
आंदोलकांच्या हातात ब्राझीलचा झेंडा होता आणि त्यांनी राष्ट्रीय फुटबॉल संघाचा पिवळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता.



२२ राज्यांसह राजधानी ब्राझिलिया येथे आंदोलन
1 ०५ लाख लोकांनी साओ पाओलोतल्या आंदोलनात भाग घेतला. हा विरोधकांचा बालेकिल्ला आहे.

2 ४०,००० लोकांनी ब्राझिलियात काँग्रेससमोरील आंदोलनात भाग घेतला.

3 २५,००० लोक रिओ दी जिनेरिओतील आंदोलात सहभागी झाले.

4 १० लाख लोकांनी आंदोलनात भाग घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

व्हेनेझुएलाच्या मार्गाने?
४सामान्य लोकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती अशीच राहिल्यास ब्राझीलचे आगामी काळात व्हेनेझुएला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती या आंदोलनात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने व्यक्त केली.

नवी पावले उचलणे गरजेचे
कायदामंत्री जोजे एडुआर्डो कार्डोजो यांनी सांगितले की, ‘हे आंदोलन लोकशाहीचे रूप आहे. शांततापूर्ण आणि कायदेशीर मार्गाने आंदोलन पार पडले. कोणताही दबाव न टाकता विचार मांडणे ही ब्राझीलच्या लोकांची पद्धती आहे. आंदोलनामुळे भ्रष्टाचाराविरोधात ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होते.’

Web Title: Front for the lifting of the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.