३० वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित
By admin | Published: January 18, 2016 03:34 AM2016-01-18T03:34:14+5:302016-01-18T03:34:14+5:30
जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पोलर रिसर्चच्या वैज्ञानिकांना ३० वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे.
टोकिओ : जपानच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पोलर रिसर्चच्या वैज्ञानिकांना ३० वर्षांपूर्वी गोठलेला प्राणी पुनरुज्जीवित करण्यात यश आले आहे. अतिशय लहान जवळपास १ मि.मी.पेक्षा कमी लांबीचा हा प्राणी अंटार्टिकावर शास्त्रज्ञांना मिळाला. अतिशय विपरीत परिस्थितीत तो होता.
क्रायोबॉयोलॉजी मासिकात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार ‘वॉटर बियर’गटातील हा सूक्ष्म प्राणी १९८३ मध्ये अंटार्टिकावरील मॉस झुडपावर आढळला होता. त्याला उणे २० तापमानावर ठेवण्यात आले. त्याच्यावर आवश्यक ते उपचार केल्यानंतर मे २०१४ मध्ये त्याला साधारण तापमानावर आणले गेले. त्याला पुनरुज्जीवित केल्यानंतर पंधरवड्यानंतर त्याच्या हालचाली सुरू झाल्या व तो अन्न ग्रहण करू लागला. त्याची १९ पैकी १४ अंडी उबविण्यात यश आले. यापूर्वी असा प्राणी नऊ वर्षांनंतर पुनरुज्जीवित करण्यात यश आले होते; पण यावेळी ३० वर्षांपूर्वीचा प्राणी पुनरुज्जीवित करण्याचा प्रयोग शास्त्रज्ञांनी यशस्वी केला.(वृत्तसंस्था)