फ्युगो ज्वालामुखीचा महाभयंकर उद्रेक, 25 लोकांचा मृत्यू, 17 लाख लोकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 02:09 AM2018-06-05T02:09:52+5:302018-06-05T02:09:52+5:30
ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे.
ग्वाटेमाला शहराजवळ असलेल्या फ्युगो ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे २५ जणांचा मृत्यू झाला असून, ३००हून अधिक जण गरम राखेमध्ये भाजले गेले आहेत. या उद्रेकाचा आसपासच्या शहरांमधील १७ लाख नागरिकांना फटका बसला आहे.
ग्वाटेमाला शहरात नदीच्या रूपात लाव्हा वाहू लागला असून, अनेक ठिकाणी राख पसरली आहे. रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आॅरोरा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आला आहे.
700 डिग्रीपर्यंत लाव्हाचे तापमान जाऊ शकते आणि हा लाव्हा १५ किमीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती ग्वाटेमाला येथील भूकंप आणि ज्वालामुखी तज्ज्ञ ए. डी. साचेंज यांनी व्यक्त केली.
सेंटियागुइटो आणि पकाया असे आणखी दोन ज्वालामुखी ग्वाटेमालामध्ये आहेत आणि त्यांचाही कोणत्याही वेळी उद्रेक होऊ शकतो.
44 वर्षांनंतर एवढा मोठा झाला उद्रेक
03 शहरांमध्ये रेड अॅलर्ट आणि संपूर्ण ग्वाटेमाला देशात आॅरेंज अॅलर्ट जारी
03 हजार लोकांना आपत्तीग्रस्त भागातून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.
08 किलोमीटर पसरली राख या ज्वालामुखी उद्रेक एवढा मोठा होता की, यातून निघालेला लाव्हा आणि राख आठ किमीपर्यंत पसरली आहे. या वर्षीचा फ्युगोचा हा दुसरा स्फोट आहे.