ड्रोनच्या परिणामकारक वापरासाठी फझी लॉजिक

By admin | Published: February 27, 2017 04:47 AM2017-02-27T04:47:44+5:302017-02-27T04:47:44+5:30

ड्रोन्स फिरत्या पृष्ठभागावर कोणाच्याही मदतीशिवाय चालू व उतरू शकले पाहिजेत यासाठी वैज्ञानिक फझी लॉजिक या नावाच्या कृत्रिम तंत्राचा वापर करत आहेत.

Fuzzy logic for effective use of drones | ड्रोनच्या परिणामकारक वापरासाठी फझी लॉजिक

ड्रोनच्या परिणामकारक वापरासाठी फझी लॉजिक

Next


न्यूयॉर्क : ड्रोन्स फिरत्या पृष्ठभागावर कोणाच्याही मदतीशिवाय चालू व उतरू शकले पाहिजेत यासाठी वैज्ञानिक फझी लॉजिक या नावाच्या कृत्रिम तंत्राचा वापर करत आहेत. या वैज्ञानिकात भारतीय वंशाचे मनीष कुमार यांचा समावेश आहे. कुमार हे अमेरिकेतील युनिव्हरसिटी आॅफ सिनसिन्नाटीमध्ये सहयोगी प्रोफेसर आहेत.
मनीष कुमार यांनी सांगितले की युनिव्हरसिटी आॅफ सिनसिन्नाटीच्या संशोधकांनी जी संकल्पना वापरली तिला फझी लॉजिक म्हणतात. ही संकल्पना लोक रोजच्या व्यवहारात सुप्तपणे ( सबकॉन्शसली) वापरत असतात. जगाला एक तर काळे किंवा पांढरे या दोनच रंगात न बघता फझी लॉजिक सत्याचा सूक्ष्मभेद किंवा अंश मान्य करतो. हा एकमेव व्यावहारिक मार्ग ड्रोन्सचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करण्यासाठी उपलब्ध आहे, असे मनीष कुमार म्हणाले.
ड्रोन्सचा वापर ग्राहकाला टॉयलेट पेपर त्याच्या घरी देण्यासाठी केला जाऊ शकतो तो या तंत्राने.
फझी लॉजिकच्या मदतीने ड्रोन्स समुद्रामध्ये सांख्यिकी गोंधळ असताना प्रवासाचा चांगला निर्णय घेऊ शकतात. त्याला जेनेटिक फझी म्हणतात व ती काळ जसा पुढे जाईल तशी विकसित होत जाते व दुय्यम प्रतीच्या उत्तरांना ती नाकारते, असे ते म्हणाले. संशोधकांनी कृत्रिम परिस्थितीमध्ये फझी लॉजिकचा वापर यशस्वीपणे केला व ही पद्धत गतिमान परिस्थितीत प्रवासासाठी खूप आदर्श असल्याचे दाखवले.
ड्रोन्सना हवेत असताना तसेच फिरत्या पृष्ठभागावर (उदा. डिलिव्हरी व्हॅन किंवा खवळलेल्या समुद्रात अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकांवर) उतरण्यास अडचणी येतात, असे संशोधकांनी म्हटले. ड्रोन्सना ठरवून दिलेल्या जागेत खूपच कमी चूक करून उतरावे लागते. फिरत्या वा चालत्या पृष्ठभागावर ड्रोन्सने उतरणे हा वैज्ञानिकदृष्ट्या व इंजिनियरिंगच्या दृष्टीने खूपच अवघड प्रश्न असल्याचे मनीष कुमार म्हणाले.

Web Title: Fuzzy logic for effective use of drones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.