जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प

By admin | Published: July 8, 2017 06:49 AM2017-07-08T06:49:34+5:302017-07-08T06:49:34+5:30

जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध

G-20 member countries pledge to break the tone of terrorism | जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प

जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प

Next

 ऑनलाइन लोकमत

हॅम्बर्ग, दि. 8 - जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली. 
जी-20 संमेलनात जगातील आघाडीच्या देशांचे नेते म्हणाले, " दहशतवादाच्या प्रसारासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उपयोग होऊ नये, यासाठी सर्व देश खाजगी विभागासोबत मिळून काम करतील." यावेळी सर्व देशांमध्ये दहशतवादासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एकमत झाले. जेव्हा दहशतवाद्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा आणि आर्थिक मदत मिळणार नाही, तेव्हाच दहशतवादाचा खात्मा करणे शक्य होईल, असेही या नेत्यांनी सांगितले.  
कार्यक्रमाच्या अखेरीच दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना जी-20 देशांचे नेते म्हणाले, दहशतवाद हा आज एक जागतिक आजार बनला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्याच्याशी लढण्याची गरज आहे. दहशतवाद्यांची जगातील आश्रयस्थाने नष्ट झाली पाहिजेत." 
त्याआधी जी-20 संमेलनात  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कडक भूमिका मांडली होती. मोदींनी यावेळी दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी 10 मोठ्या योजनांची घोषणा केली. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी एक अ‍ॅक्शन प्लानच जगासमोर ठेवला. 
मोदींनी दहशतवादाविरोधात जगातील इतर देशांना एकत्र येण्याचे आवाहनही केले इसिस, अल कायदा या दहशतवादी संघटनांप्रमाणेच पाकिस्तानल्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत आणि दहशतवाद पसरवत आहेत. मिडल ईस्टमध्ये अल कायदा, दक्षिण आशियात लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हक्कानी नेटवर्क आणि नायजेरियात बोको हरम यांसारख्या दहशतवादी संघटनांनी अनेक देशांत उच्छाद मांडला आहे. या संघटनांचे दहशतवादी निरपराध लोकांचे जीव घेऊन समाजात दुही माजवण्याचं काम करत आहेत. 
तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी सायबर स्पेस, इंटरनेट, सोशल मीडिया यांचाही हे दहशतवादी सर्रास वापर करत आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 10 सूत्रं जगासमोर ठेवली आहेत. मोदींच्या दहशतवादाविरोधातल्या लढ्याचं जर्मनीचे चॅन्सलर एंजेला मार्केल यांनीही तोंडभरून कौतुक केले आहे. दहशतवादाविरोधात सगळ्या देशांनी एकत्र यायला हवे आणि त्याचा बीमोड केला पाहिजे, असेही मोदी म्हणाले आहेत.

Web Title: G-20 member countries pledge to break the tone of terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.