दिल्लीच्या चेतन कक्करला गुगलनं दिलं १.२५ कोटी रुपयांचं पॅकेज
By Admin | Published: November 21, 2015 05:56 PM2015-11-21T17:56:42+5:302015-11-21T17:56:42+5:30
दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या चेतन कक्कर या तरुणाला गुगलने वर्षाला सव्वा कोटी रुपयांचे पगाराचे पॅकेज देऊ केल्याचे वृत्त आहे
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या चेतन कक्कर या तरुणाला गुगलने वर्षाला सव्वा कोटी रुपयांचे पगाराचे पॅकेज देऊ केल्याचे वृत्त आहे. चेतन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या शेवटच्या वर्षात आहे. दिल्ली टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या इतिहासामध्ये हे सगळ्यात जास्त पॅकेज असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याआधी ९३ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजची माहिती आहे. मी याच दिवसाची प्रतीक्षा करत होतो आणि गुगलसाठी काम करायला मी उत्सुक आहे अशी प्रतिक्रिया चेतनने व्यक्त केली आहे. पुढील वर्षी अभ्यासक्रम संपला की तो गुगलच्या कॅलिफोर्निया येथील कार्यालयात रूजू होणार आहे.
चेतनचे आई व वडील दोघेही शिक्षक आहेत.