भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी गजरेची, नरेंद्र मोदींचं G20 सदस्यांना आवाहन
By admin | Published: September 5, 2016 11:03 AM2016-09-05T11:03:10+5:302016-09-05T11:13:10+5:30
परिणामकारक शासन हवं असेल तर भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी असणं तसंच आर्थिक गुन्हेगारांसाठी असलेल्या सुरक्षित ठिकाणांना हटवून टाकणे म्हत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत
Next
>- ऑनलाइन लोकमत
हँगझोऊ (चीन), दि. 5 - परिणामकारक शासन हवं असेल तर भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी बांधिलकी असणं तसंच आर्थिक गुन्हेगारांसाठी असलेल्या सुरक्षित ठिकाणांना हटवून टाकणे म्हत्वाचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. जी 20 परिषदेतील सदस्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी बँकिंग गुप्तता पद्धत पुर्णपणे पाडून टाकण्याचं आवाहनही केलं आहे.
चीनमध्ये जी 20 परिषदेच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्यांशी संवाद साधला. परिणामकारक शासनासाठी भ्रष्टाचार, काळा पैसा आणि करचुकवेगिरी करणा-यांशी लढा देणे महत्वाचे असल्याचं मोदी बोलले आहेत.