'गांधी' चे दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो यांचे निधन
By admin | Published: August 25, 2014 05:55 AM2014-08-25T05:55:29+5:302014-08-25T11:17:22+5:30
गांधी या चित्रपटाने भारतीयांच्या मनात घर करणारे ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो यांचे रविवारी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
लंडन,दि.२५ - गांधी या चित्रपटाने भारतीयांच्या मनात घर करणारे ब्रिटिश दिग्दर्शक रिचर्ड अॅटेनबरो यांचे रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या मुलाने ही दुःखद बातमी प्रसारमाध्यमांना दिली. गांधी चित्रपटासाठी त्यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कारही देण्यात आला होता. तसेच जुरॅसिक पार्क, द ग्रेट एस्केप हे त्यांची भूमिका असलेले चित्रपट विलक्षण गाजले.
लॉर्ड अॅटेनबरो ब्रिटनच्या उल्लेखनिय कलाकारांपैकी एक होते. दिग्दर्शनापूर्वीते स्वतः अभिनय करत होते. कलेची जाण असलेल्या या असामान्य वल्लीने दुस-या महायुद्धावर चित्रित केलेला द ग्रेट एस्केप हा त्यांची जगभर ओळख करून देणारा चित्रपट ठरला. अॅटेनबरो यांनी तब्बल साठ वर्ष चित्रपट क्षेत्रात काम केलं. जुरॅसिक पार्क मुळे ते एकविसाव्या शतकातील युवकांच्या कायम लक्षात राहतील. तर महात्मा गांधींवरील चित्रपटाने त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अविस्मरणीय चित्रपटांच्या माध्यमातून लॉर्ड रिचर्ड अॅटेनबरो अजरामर राहतील.