लंडनमध्ये उभारणार गांधीजींचा पुतळा

By admin | Published: November 10, 2014 02:04 AM2014-11-10T02:04:17+5:302014-11-10T02:04:17+5:30

शिल्पकार फिलिप जॅकसन हा पुतळा घडवीत आहेत. १९३१ मध्ये डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर महात्मा गांधी उभे असलेले छायाचित्र त्यांनी पुतळ्यासाठी निवडले आहे.

Gandhiji statue to be set up in London | लंडनमध्ये उभारणार गांधीजींचा पुतळा

लंडनमध्ये उभारणार गांधीजींचा पुतळा

Next

लंडन : सत्य, अहिंसा आणि शांततेची अवघ्या जगाला शिकवण देणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पुढल्या वर्षी लंडनमधील संसद चौकात (पार्लमेंट स्क्वेअर) अनावरण करण्याच्या दृृष्टीने सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. यासाठी पुढाकार घेणाऱ्या गांधी स्टॅच्यू मेमोरियल ट्रस्टने मातीत तयार करण्यात आलेले पूर्णाकृती शिल्पाकृतीचे छायाचित्रही जारी केले असून त्याआधारे कास्याचा पूर्णाकृती पुतळा बनविण्यात येणार आहे, असे या ट्रस्टचे संस्थापक लॉर्ड मेघानंद देसाई यांनी सांगितले.
शिल्पकार फिलिप जॅकसन हा पुतळा घडवीत आहेत. १९३१ मध्ये डाऊनिंग स्ट्रीटच्या बाहेर महात्मा गांधी उभे असलेले छायाचित्र त्यांनी पुतळ्यासाठी निवडले आहे.
 

Web Title: Gandhiji statue to be set up in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.