भारतातील धार्मिक असहिष्णूतेमुळे गांधीजींना धक्का बसला असता - ओबामा

By admin | Published: February 6, 2015 08:53 AM2015-02-06T08:53:23+5:302015-02-06T09:01:47+5:30

गेल्या काही वर्षांत भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णूतेमुळे महात्मा गांधींना धक्का बसला असता, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे.

Gandhiji was shocked due to India's religious intolerance - Obama | भारतातील धार्मिक असहिष्णूतेमुळे गांधीजींना धक्का बसला असता - ओबामा

भारतातील धार्मिक असहिष्णूतेमुळे गांधीजींना धक्का बसला असता - ओबामा

Next

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. ६ - गेल्या काही वर्षांत भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णूतेमुळे महात्मा गांधींना धक्का बसला असता, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. भारत दौ-यातील निरोपाच्या भाषणावेळी बराक ओबामा यांनी धार्मिक कट्टरतेवरून भाजपाला कोणताही डोस पाजला नव्हता असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केल्याच्या दुस-याच दिवशी बराक ओबामांनी एका कार्यक्रमात हे विधान करत भारताचे कान टोचले आहेत. गुरूवारी अमेरिकेतील 'नॅशनल प्रेयर कॉन्फरन्स' दरम्यान ते बोलत होते.
'मी आणि मिशेल नुकतेच भारतातून परत आलो, तो अतिशय सुंदर आणि विविधतेने नटलेला असा देश आहे.  मात्र गेल्या काही वर्षांत काही धर्माचे लोक फक्त वेगळा वारसा व श्रद्धेच्या आधारावर इतर धर्मांतील लोकांना लक्ष्य करत आहेत. देशाला उदार मतवादी बनवण्यात मोठा वाटा असणा-या महात्मा गांधींनाही हे सर्व पाहून धक्का बसला असता' असे ओबामा म्हणाले. गेल्या काही काळात झालेल्या हिंसेबद्दल बोलत असताना त्यांनी हे मत मांडले. मात्र ही हिंसा केवळ एका धर्मापुरती मर्यादित नव्हती असे सांगत त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे नाव घेणे टाळले. ओबामांचे हे विधान भाजपाच्या विचारसरणीवरील अप्रत्यक्ष टीका असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी 'दलाई लामा' यांचीही स्तुती केली. 'तिबेटचे सर्वोच्च नेते असलेले दलाई लामा आपले चांगले मित्र' असल्याचे ते म्हणाले. मानवता व स्वातंत्र्य यांचा प्रचार करण्यास दलाई लामा आम्हाला नेहमीच प्रेरित करतात, असेही त्यांनी सांगितले. 

Web Title: Gandhiji was shocked due to India's religious intolerance - Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.