नायजेरियात उभारली राम मंदिराची प्रतिकृती; मराठी माणसांकडून गणेशोत्सवाचा जल्लोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:04 PM2024-09-16T12:04:39+5:302024-09-16T12:08:22+5:30
Ganesh Mahotsav 2024 : पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे.
Ganesh Mahotsav 2024 : पश्चिम आफ्रिका नायजेरिया देशातील महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदाचे ३६ वे वर्ष आहे त्यानिमित्ताने सकल हिंदु बांधवांना ज्याचा अभिमान आहे आणि ५०० वर्षाहून अधिक काळ ज्यांची प्रत्येक भारतीयाने वाट पाहिली अशा श्रीरामजन्मभुमी श्रीक्षेत्र अयोध्या येथे स्थापन झालेल्या राममंदिराची प्रतिकृती साकार केली आहे.
नायजेरिया सारख्या देशात अशी सजावट करणे हे खूप जिकिरीचे तसेच आव्हानात्मक काम होते कारण कोणतीही गोष्ट येथे सहज शक्य नाही पण महाराष्ट्र मंडळ नायजेरियाचे सर्व कार्यकर्त्यानी आपला नोकरीधंदा सांभाळून हे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलुन १८ फूट उंच आणि २२ फूट रुंद भव्य अयोध्या राम मंदिराचा देखावा सादर केला आहे. या मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची मूर्ती साकारणारा कलाकार हा स्थानिक म्हणजे नायजेरियाचा नागरिक आहे.
यानिमित्त लागोस नायजेरियातील 'कॉन्सल्ट जेनेरल ऑफ इंडिया' यांनी मंडळाला सदिच्छा भेट देऊन प्रशंसा आणि यथोचित सन्मान केला.