लंडनमधील महाराष्ट्र मंडळात उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव

By admin | Published: September 21, 2016 01:03 PM2016-09-21T13:03:52+5:302016-09-21T18:04:39+5:30

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या सदस्यांनी '१० दिवस' उत्साहात 'गणेशोत्सव' साजरा केला.

Ganeshotsav celebrated in the Maharashtra circle of London | लंडनमधील महाराष्ट्र मंडळात उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव

लंडनमधील महाराष्ट्र मंडळात उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. २१ - बुद्धीचे आराध्यदैवत असलेला आणि तुम्हा- आम्हा सर्वांचा लाडका देव गणपती बाप्पाचे आगमन हे सर्वांसाठीच सुखकर आणि आनंददायी असते. भारताप्रमाणाचे इतर देशांतही 'गणेशोत्सव' धूम-धडाक्यात आणि तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो. कामामुळे वा शिक्षणासाठी परदेशात राहणारे भारतीय नागरिक तेथे राहूनही विविध सण उत्साहात साजरे करून मातृभूमीशी असलेलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करतात. अशाच कल्पनेतून लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे नुकताच '१० दिवस' उत्साहात 'गणेशोत्सव' साजरा करण्यात आला.
 
विशेष म्हणजे या उत्सवासाठी फक्त महाराष्ट्रीयन नागरिक नव्हे तर इतर धर्म, पंथाचे नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. १० दिवसांच्या या उत्सवात ३००० हजारांहून अधिका नागरिकांनी उपस्थिती लावत बाप्पाचे आशिर्वाद घेतले. मूळचे औरंगाबाद असलेले सुशील रापतवार हे इंजीनियर व प्रोजेक्ट मॅनेजर असून ते सध्या लंडनमधील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात. 
१० दिवस चाललेल्या या गणेशोत्सवादरम्यान रोजची साग्रसंगीत पूजा आणि आरती यांसह  विविध कार्यक्रमांची रेलेचेल होती. लंडनचे उपमहापौर असलेले भारतीय वंशाचे राजेश अगरवाल यांच्यासह उदयराज गडणीस, आशिष शर्मा हे कलाकार व अनेक दिग्गज व्यक्तीही कार्यक्रमास उपस्थित होत्या. 
 
गणेशोत्सवादरम्यान अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. प्रख्यात नृत्यांगना अश्विनि काळसेकर व रागसुधा रापतवार यांनी 'सुखकर्ता दु:खहर्ता' या आरतीवर आधारित कथकनाट्यम सादर केले. तसेच शिवांगी गोखले, येशा लखानी, शिल्पा परूचुरूस प्रीतीदीपा बारूआस प्रिया अय्यर आणइ शिल्पा चौधरी यांनी ' एकता की आवाज' हा डान्स बॅलेट सादर केला. 
मानसी जोशी यांचे शास्त्रीय गायन, आदिती पाटील व ऋजुता सिंग यांनी ' देवा श्रीगणेशा' गीतावर सादर केलेले नृत्य तसेच हार्दिक वैद्य व नचिकेत चांडक यांच्या ग्रुपने सादर केलेल्या नृत्याने सर्व रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच ३० चिमुकल्यांनी 'बाल दरबार'द्वारे आपल्या कला सादर केल्या.
 
नंदिनी शिरळकर आणि वैशाली मंत्री यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे निवदेन केले. तसेच विख्यात कलाकार  अमर ओक यांच्या ' अमर बन्सी' या सुरेल कार्यक्रमानेही रसिकांना भुरळ घातली.  १५ सप्टेंबर रोजी, अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. 
 
 

Web Title: Ganeshotsav celebrated in the Maharashtra circle of London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.