अंतराळात कचरा, आता उपग्रहांना धाेका; चीनच्या कृतीमुळे मोहिमांना फटका बसण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 02:10 PM2024-08-11T14:10:56+5:302024-08-11T14:13:39+5:30

चीनने ६ ऑगस्ट रोजी लाँग मार्च ६ए रॉकेटच्या मदतीने इंटरनेट सॅटेलाईट प्रक्षेपणाचा टप्पा पूर्ण केला

Garbage in space, now a threat to satellites Fears that China's actions will affect missions | अंतराळात कचरा, आता उपग्रहांना धाेका; चीनच्या कृतीमुळे मोहिमांना फटका बसण्याची भीती

अंतराळात कचरा, आता उपग्रहांना धाेका; चीनच्या कृतीमुळे मोहिमांना फटका बसण्याची भीती

बीजिंग : उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने सॅटेलाईट इंटरनेटसाठी स्टारलिंक योजना सुरू केली आहे. या मोहिमेविरोधात चीनने सोडलेल्या १८ उपग्रहांमुळे अवकाशात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला आहे. यामुळे इतर देशांचे उपग्रह आणि स्पेस स्टेशन्सना धोका निर्माण झाला आहे. 

चीनने ६ ऑगस्ट रोजी लाँग मार्च ६ए रॉकेटच्या मदतीने इंटरनेट सॅटेलाईट प्रक्षेपणाचा टप्पा पूर्ण केला. यात १८ उपग्रह अवकाशात सोडले होते. रॉकेटचा पुढचा भाग तुटून इतर भाग अंतराळात विखुरले गेले होते.  (वृत्तसंस्था)

  • प्रवासी विमानांना धोका नाही

अमेरिकेतील संस्था स्पेस फोर्सचे म्हणणे आहे की, चीनच्या लाँग मार्च ६ ए या रॉकेटचा वरचा भाग अंतराळात तुटल्याने हा कचरा पसरला आहे. पृथ्वीवरून होणाऱ्या प्रवासी विमानांच्या उड्डाणांना यामुळे कोणताही धोका नाही.

  • ५० तुकडे धोकादायक

रॉकेटचा मु्ख्य भाग आणि इतर तुकडे सध्या अंतराळात तरंगत आहेत. यातील ५० तुकडे धोकादायक आहेत. हे ७.५ किलोमीटर प्रति सेकंद या गतीने फिरत आहेत. सॅटेलाईटचे ३०० तुकडे अंतराळात पसरले आहेत. याचाच इतर उपग्रहांना धोका असल्याचे जाणकार सांगतात.

Web Title: Garbage in space, now a threat to satellites Fears that China's actions will affect missions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन