गाझा: अडकलेल्यांना मदतीचा ओघ सुरू; इजिप्तची सीमा शनिवारी झाली खुली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 06:13 AM2023-10-22T06:13:56+5:302023-10-22T06:14:59+5:30
इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे.
वॉशिंग्टन : हमास या दहशतवादी संघटनेने ओलीस ठेवलेल्यांपैकी ज्युडिथ व त्यांची मुलगी नताली रनन या दोन अमेरिकी महिलांची मुक्तता केली. या संघटनेने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ले केले होते. तेव्हा या तावडीत सापडल्या होत्या. इस्रायलने कोंडी केलेल्या गाझातील पॅलेस्टिनी नागरिकांना मदत पुरविण्यासाठी इजिप्तची सीमा शनिवारी खुली करण्यात आली.
गाझामधील नागरिकांना मदत पुरविण्यासाठी इजिप्तने सीमा शनिवारी खुली केली. त्याला इस्रायलनेही होकार दर्शविला. इजिप्तमार्गे पॅलेस्टिनींना जीवनावश्यक वस्तूंची मदत पुरविण्यास सुरुवात झाल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी समाधान व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)
आणखी १० जण ताब्यात
- आणखी दहा अमेरिकी नागरिक हमासच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले.
- गाझावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांपासून जीव वाचविण्यासाठी गाझातील अडीच लाख लोकांनी सुरक्षित जागी स्थलांतर केले होते.
- त्यांना इजिप्तमार्गे अन्नधान्य, पिण्याचे पाणी, औषधे, इंधन पुरविण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले.
- गाझातील रुग्णालयांमध्ये औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असून त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
- या अडचणींवर मात करण्यासाठी इजिप्तमार्गे येणारी मदत ही खूपच उपयोगी ठरणार आहे.