GAZA Attack: इस्त्रायलची खतरनाक, अचूक 'आयर्न डोम' यंत्रणा चुकली; हमासचे रॉकेट समजून स्वत:चेच ड्रोन पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 01:41 PM2021-05-30T13:41:11+5:302021-05-30T13:41:32+5:30
Israel’s Iron Dome Shot-Down Its Own Drone: इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सने १७ मे ला ही घोषणा केली होती. हमासने सांगितले की, युद्धावेळी आम्ही अनेक ड्रोन इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. यामध्ये शेहाब नावाचा एक नवीन आत्मघातकी ड्रोन आहे.
तेल अवीव : इस्त्रायल फोर्सेस (IDF) ने पॅलेस्टाईन दहशतवाद्यांशी लढताना एक रॉकेट पाडले होते. मात्र, ते इस्त्रायलचेच (Israel) ड्रोन असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इस्त्रायलचे सैन्य एल्बिट स्कायलार्क ड्रोन हेरगिरीसाठी वापरते. इस्त्रायलचे सुरक्षा कवच असलेल्या आयर्न डोम बॅटरीने हमासचे रॉकेट असल्याचे समजून मिसाईल फायर केले आणि आपलेच ड्रोन पाडले. (Israel Defense Forces (IDF) shot down one of their own drones during the 11-day conflict with Gaza-based militant groups, the service confirmed Tuesday.)
या घटनेमुळे इस्त्रायलच्या सैन्याला मोठा धक्का बसला असून ड्रोन ऑपरेशन आणि दुश्मनांच्या रॉकेटना युव्हीद्वारे ओळखण्यासाठी त्यांच्या अभेद्य आयर्न डोमला बदलण्याची तयारी केली जात आहे. इस्त्रायलचे अधिकारी आता भविष्यात आपलेच ड्रोन पुन्हा पाडले जाऊ नयेत यासाठी तयारी करत आहेत. यासाठी इस्त्रायल सैन्य आणि हवाई दल सोबत मिळून काम करत आहेत. इस्त्रायलचे वृत्तपत्र हारेत्ज़ने सर्वात आधी हे ड्रोन पाडले गेल्याची बातमी दिली होती. मात्र, सरकारकडून याचा स्वीकार करण्यात आला नव्हता.
WATCH as the Iron Dome Aerial Defense System intercepts rockets over southern Israel: pic.twitter.com/xUz3bMuTzz
— Israel Defense Forces (@IDF) May 12, 2021
आता इस्त्रायलच्या सैन्याने हे मान्य केले आहे. त्यांच्या आयर्न डोमने चुकीने आपलेच ड्रोन पाडले, असे म्हटले आहे. मात्र, ही घटना कधी घडली ते मात्र सांगितलेले नाही. तसेच या युद्धात किती ड्रोन पाडले गेलेत हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाहीय.
इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सने १७ मे ला ही घोषणा केली होती. हमासने सांगितले की, युद्धावेळी आम्ही अनेक ड्रोन इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. यामध्ये शेहाब नावाचा एक नवीन आत्मघातकी ड्रोन आहे. हे ड्रोन तंत्रज्ञान इराणकडून मिळाले होते. हे ड्रोन इराणचे अबाबील ड्रोनची कॉपी म्हटले जाते. हमास आणि इस्त्रायलमध्ये 10 मे पासून संघर्ष सुरु झाला होता. जवळपास 11 दिवस हल्ले सुरु होते. यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 11 इस्त्रायलचे नागरिक आहेत.