चिमुकल्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी इस्रायल तयार; जाणून घ्या का घेतला हा निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 05:41 PM2023-11-12T17:41:17+5:302023-11-12T17:42:19+5:30

इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवारी (12 नोव्हेंबर) गाझामधील सर्वात मोठं हॉस्पिटल अल शिफामधून लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत.

gaza hamas palestine attack israel agreed to evacuate babies from main gaza hospital amid war | चिमुकल्यांना रुग्णालयातून बाहेर काढण्यासाठी इस्रायल तयार; जाणून घ्या का घेतला हा निर्णय?

फोटो - AP

हमासविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्याने गाझा रुग्णालयातून मुलांना बाहेर काढण्याची तयारी दर्शवली आहे. इस्रायली सैन्याने सांगितले की, ते रविवारी (12 नोव्हेंबर) गाझामधील सर्वात मोठं हॉस्पिटल अल शिफामधून लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तयार आहेत.

इस्रायल सैन्याचे मुख्य प्रवक्ते रिअर एडमिरल डॅनियल हगारी यांनी सांगितलं की, अल शिफा कर्मचार्‍यांच्या विनंतीनुसार इस्रायली सैन्य मुलांना रुग्णालयातून बाहेर काढण्यास मदत करेल. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंधन संपल्याने दोन नवजात बालकांचा मृत्यू झाला, तर इतर अनेक चिमुकल्यांचा जीव धोक्यात आला आहे.

गाझा सीमा प्राधिकरणाने सांगितलं की इजिप्तमधील राफा क्रॉसिंग शुक्रवारी (10 नोव्हेंबर) बंद केल्यानंतर, ते रविवारी (12 नोव्हेंबर) परदेशी पासपोर्ट धारकांसाठी पुन्हा उघडलं जाईल. रुग्णालयाचे संचालक मुहम्मद अबू सल्मिया यांनी अल जजीरा टीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांचं संरक्षण करणं ही त्यांची पहिली प्राथमिकता आहे.

रुग्णालयात विजेचा तुटवडा

अबू सल्मिया म्हणाले, "आम्ही रेड क्रॉसशी संपर्क साधला आणि त्यांना कळवलं की आमच्याकडे पाणी, ऑक्सिजन, इंधन आणि इतर सर्व काही संपलं आहे. त्यामुळे नवजात बाळ, अतिदक्षता विभागात असलेले रुग्ण आणि जखमी लोकांचा वीज नसल्यामुळे मृत्यू होऊ शकतो."

इस्रायलने लोकांना रुग्णालय रिकामं करण्यास सांगितलं

इस्रायलने म्हटलं आहे की डॉक्टर, रुग्ण आणि उत्तर गाझामधील रुग्णालयांमध्ये आश्रय घेणारे लोकांनी निघून जावे जेणेकरुन त्यांचं सैन्य हमासशी सामना करू शकतील. तर हमासने सांगितलं की, गेल्या 48 तासांत गाझामधील 160 हून अधिक इस्रायली लष्करी ठिकाणं पूर्णपणे किंवा अंशत: नष्ट केले आहेत. त्यात 25 हून अधिक वाहनांचाही समावेश होता. 
 

Web Title: gaza hamas palestine attack israel agreed to evacuate babies from main gaza hospital amid war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.