आता अमेरिकेलाही युद्धाची धग; रुग्णालयावरील हल्ल्यानं संताप वाढला, लेबनाननं US चा दूतावास जाळला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:31 PM2023-10-18T12:31:02+5:302023-10-18T12:31:51+5:30

लेबनानमध्ये तर हजारो निदर्शकांनी अमेरिकेच्या दुतावासालाच आग लावली. मात्र, सेन्याने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लोकांना मागे सरकवले आणि आगीवर नियंत्रम मिळवले. 

gaza Hospital attack sparks outrage, Lebanon protester burns US embassy | आता अमेरिकेलाही युद्धाची धग; रुग्णालयावरील हल्ल्यानं संताप वाढला, लेबनाननं US चा दूतावास जाळला

आता अमेरिकेलाही युद्धाची धग; रुग्णालयावरील हल्ल्यानं संताप वाढला, लेबनाननं US चा दूतावास जाळला

इस्रायल आणि हमास युद्धाची धग आता अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. गाझा पट्टीतील एकारुग्णालयावर मंगळवारी झालेल्या मिसाईल हल्ल्यात 500 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्ता आहे. हा हल्ला, हमास अथवा पॅलेस्टाईन इस्लामिक जिहादने केल्याचा दावा इस्रायलने केला आहे. तर अरब देश या हल्ल्याचा आरोप इस्रायलवर करत आहेत. एवढेच नाही, तर या हल्ल्यानंतर अमेरिकेवरही लोक भडकले आहेत. लेबनानमध्ये तर हजारो निदर्शकांनी अमेरिकेच्या दुतावासालाच आग लावली. मात्र, सेन्याने अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लोकांना मागे सरकवले आणि आगीवर नियंत्रम मिळवले. 

यावेळी, लेबनानमधील अमेरिकन दूतावासाबाहेर हजारोंचा जमाव जमला होता. या जमावातील लोकांच्या हाती पॅलेस्टाईनचा झेंडा होता. हे लोक अमेरिका आणि इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. याच वेळी जमावातील काही लोकांनी दूतावासाला आग लावली. एवढेच नाही, तर काहींनी अमेरिकेच्या दुतावासारून अमेरिकेचा झेंडा काढून त्या ठिकाणी पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्याचाही प्रयत्न केला. याशिवाय, लेबननमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने एक दिवसीय बंदची घोषणाही केली आहे. 

दरम्यान, अमेरिकेने अलर्ट जारी करत आपल्या नागरिकांना लेबनानचा दौरा टाळण्याचे आवाहन केले असून दूतावासातील आपल्या कर्मचाऱ्यांनाही परत बोलावले आहे. महत्वाचे म्हणजे, रुग्णालयावरील हल्ल्यात 500 निर्दोष लोक मारले गेल्याने संपूर्ण जगात हळहळ व्यक्त केली जात आहे. युद्धात अशा हल्ल्याच्या जबाबदारीवून हमास आणि इस्रायल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत.

रुग्णांलयावरील हल्ल्यासंदर्भात IDF -  
तत्पूर्वी, यासंदर्भात माहिती देताना आयडीएफने म्हटले आहे, रुग्णालयावरील हल्ल्याला इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. शत्रूकडून इस्रायलवर अनेक रॉकेट लॉन्च करण्यात आले होते. यांपैकी एका अयशस्वी छरलेल्या रॉकेटने गाझातील या रुग्णालयाला निशाणा बनवले. आमच्याकडे असलेल्या गुप्त माहितीनुसार, रुग्णालयावर झालेल्या या रॉकेट हल्ल्याला इस्लामिक जिहाद जहशतवादी संघटना जबाबदार आहे.

हा हवाई हल्ला मध्य गाझातील अल अहली रुग्णालयावर झाला. हे गाझा पट्टीतील शेवटचे ख्रिश्चन रुग्णालय असल्याचे सांगण्यात जाते. इस्रायली सैन्याने मंगळवारी रात्री अल अहली अरबी बापटिस्ट रुग्णालयावर एअरस्ट्राइक केल्याचा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला होता. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर जखमी आणि इतर पॅलेस्टाईनच्या नागरिकांनी आसरा घेतला होता.
 

Web Title: gaza Hospital attack sparks outrage, Lebanon protester burns US embassy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.