गीता आज भारतात येणार

By admin | Published: October 25, 2015 11:33 PM2015-10-25T23:33:07+5:302015-10-26T10:08:14+5:30

मुकी आणि बहिरी असलेली गीता (२३) पाकिस्तानातून सोमवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता नवी दिल्लीत येत आहे

Geeta comes to India today | गीता आज भारतात येणार

गीता आज भारतात येणार

Next

कराची : मुकी आणि बहिरी असलेली गीता (२३) पाकिस्तानातून सोमवारी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता नवी दिल्लीत येत आहे. दोन्ही सरकारांनी गीताच्या हस्तांतर देवाणघेवाणीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
१५ वर्षांपूर्वी गीता ७-८ वर्षांची असताना चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेली होती. पाकिस्तानी सैनिकांना ती लाहोर स्टेशनवर समझोता एक्स्प्रेसमध्ये एकटीच आढळली होती. ईधी फाऊंडेशनच्या बिल्किस ईधी यांनी तिला दत्तक घेतले होते व ती तेव्हापासून त्यांच्याचकडे राहत होती. गीता पाकिस्तान इंटरनॅशनल एअर लाईन्सच्या विमानाने भारतात रवाना होईल, असे फाऊंडेशनचे फहाद ईधी यांनी सांगितले. तिच्यासोबत मी, माझे वडील फैसल ईधी, माझी आई आणि माझी आजी जाणार आहे. गीताच्या डीएनएची चाचणी जुळेपर्यंत आम्ही भारतात राहणार असल्याचे फहाद ईधी यांनी सांगितले. इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाने जे छायाचित्र पाठविले होते त्यातील तिचे वडील, सावत्र आई आणि भावंडांना गीताने ओळखले होत

Web Title: Geeta comes to India today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.