बाबो! जेवणाचं बिल 14 हजार अन् टीप दिली तब्बल 7 लाख; स्टाफ झाला भावूक, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:25 PM2021-08-25T16:25:15+5:302021-08-25T16:32:01+5:30
Restaurant staff amazed at 7 lakhs tip on 14000 bill : हॉटेलमधील एका वेटर्सना मोठी टीप देण्यात आली आहे. जेवणाचं बिल 14 हजार झालं पण तब्बल 7 लाखांची टीप दिल्याची घटना आता समोर आली आहे.
कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात बसला. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स हे कित्येक महिने बंद होते. मात्र आता लॉकडाऊन काळातील निर्बंध हळू-हळू शिथिल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल्स सुरू झाली आहेत. अशातच एक अजब घटना समोर आली आहे. हॉटेलमधील एका वेटर्सना मोठी टीप देण्यात आली आहे. जेवणाचं बिल 14 हजार झालं पण तब्बल 7 लाखांची टीप दिल्याची घटना आता समोर आली आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida) मध्ये ही घटना घडली आहे. Wahoo Seafood Grill रेस्टॉरंटमध्ये आलेल्या एका व्यक्तीने जेवण ऑर्डर केलं, आरामात बसून तो जेवला. त्याचं बिल 140 युरो म्हणेज जवळपास 14000 रुपये झालं. पण ज्यावेळी बिल भरण्याची वेळ आली, त्यावेळी त्याने बिलाशिवाय आणखी लाखो रुपयांची टीप रेस्टॉरेंटमधील स्टाफसाठी ठेवली. या घटनेनंतर रेस्टॉरंटमध्ये काम करणारा स्टाफ अतिशय भावूक झाला.
अजब लग्नाची गजब गोष्ट! आत्याच्या प्रेमात पडला भाचा; पळून जाऊन केलं लग्न अन्...#marriagehttps://t.co/b8IHPInJMv
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2021
द मिररने दिलेल्या रिपोर्टनुसार, हा व्यक्ती फ्लोरिडाच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला. तो तिथे जेवला आणि बिल मागितलं. बिल 14000 रुपये झालं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीने रेस्टॉरेंटमध्ये असलेल्या सर्व स्टाफला डायनिंग एरियामध्ये बोलवलं आणि त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांनी दिलेल्या वागणुकीसाठी त्यांचे आभार मानले. त्यानंतर त्याने टीप म्हणून 7 लाख 13 हजार रुपये दिले. पैसे केवळ दिले नाही, तर या पैशाचा किती वाटा प्रत्येकाने घ्यायचा हे देखील त्याने सांगितलं. 75 हजार रुपये प्रत्येक स्टाफने घेण्याचं त्याने सांगितलं. त्या व्यक्तीने अशाप्रकारे टीप दिल्यानंतर स्टाफला या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नव्हता.
रेस्टॉरंच्या मालकाने ही संपूर्ण घटना आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्याने पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं बिलही अटॅच केलं आहे. 'या व्यक्तीने आम्हाला सर्वांना आश्चर्यचकित केलं. वर्षभर या इंडस्ट्रीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगलं गेलं नाही, पण या घटनेनंतर माणुसकीवरील विश्वास अधिक वाढला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. फ्लोरीडामधलं हे एक स्थानिक रेस्टॉरंट असून आता त्याचीच चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सोनू सूदने दिलेल्या भन्नाट उत्तराने सर्वांचंच वेधून घेतलं लक्ष #SonuSoodhttps://t.co/RweXLHh3nI
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021