गाझामध्ये नरसंहार; शहर बेचिराख! २३ लाख लोकांची शहराबाहेर पडण्यासाठी धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:55 PM2023-10-12T12:55:58+5:302023-10-12T12:56:45+5:30

हमासने केलेल्या रक्तपाताचा बदला घेण्याची इस्रायलने शपथ घेतली असून, त्यासाठी शक्य ते सर्व पर्याय इस्रायल अजमावत आहे.

Genocide in Gaza city destroyed 23 lakh people struggle to get out of the city | गाझामध्ये नरसंहार; शहर बेचिराख! २३ लाख लोकांची शहराबाहेर पडण्यासाठी धडपड

गाझामध्ये नरसंहार; शहर बेचिराख! २३ लाख लोकांची शहराबाहेर पडण्यासाठी धडपड

जेरुसलेम : हमास दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या गाझाला इस्रायलने चारही बाजूंनी घेरले असून, २३ लाख लोक शहराबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहेत. गाझा शहराभोवती इस्रायलचे जवळपास ४ लाख सैन्य तैनात असून, ते गाझामध्ये जमिनीवरून हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे इस्रायलच्या लष्करी प्रवक्त्याने म्हटले आहे. हमासने केलेल्या रक्तपाताचा बदला घेण्याची इस्रायलने शपथ घेतली असून, त्यासाठी शक्य ते सर्व पर्याय इस्रायल अजमावत आहे.

संपूर्ण नाकेबंदीमुळे गाझा शहरातील ऊर्जा प्रकल्प बंद पडले असून, वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे गंभीर जखमी रुग्णांवर उपचार करणेही कठीण झाले आहे. विजेअभावी शेकडो मुलांचे जीव धोक्यात आले आहेत.

अन्न, पाणी, इंधन आणि औषधांचा पुरवठा बंद केल्याने जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्राणघातक हल्ल्यामुळे पॅलेस्टिनी नागरिकांनी शहराबाहेर पडण्याची धडपड सुरू केली आहे. हवाई हल्ल्यांमुळे शहर बेचिराख झाले असून, ढिगाऱ्याखाली  सैनिक, पुरुष, स्त्रिया, मुले आणि अज्ञात वृद्धांचे मृतदेह उरले आहेत. दरम्यान, आधुनिक अमेरिकन शस्त्रांची पहिली खेप इस्रायलमध्ये दाखल झाल्यामुळे या युद्धाची भीषणता दिवसेंदिवस वाढत आहे.

इस्रायलने हमास या दहशतवादी गटाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे दिवसरात्र दहशतवाद्यांना हेरून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अनेक ठिकाणी इस्रायल पॅलेस्टाईनवर हाडे वितळवणारा व्हाइट फॉस्फरस बॉम्ब फेकत आहे. त्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. 

या युद्धात आतापर्यंत जवळपास २२०० मृत्यू झाले आहेत. यात, 
१००० - पॅलेस्टिनी, १२००-इस्रायल तर १५०० दहशतवाद्यांचा समावेश आहे. 

भारताचे 'ऑपरेशन अजय' 
- ज्या भारतीयांना मायदेशात परतायचे आहे त्यांना इस्रायलमधून परत आणण्यासाठी भारताने 'ऑपरेशन अजय' सुरू केले आहे. 
- यासाठी विशेष विमाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली. इस्रायलमध्ये १८ हजार भारतीय आहेत.

 

Web Title: Genocide in Gaza city destroyed 23 lakh people struggle to get out of the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.