इसिस विरोधात लष्करी कारवाईला जर्मन संसदेची मंजूरी
By admin | Published: December 4, 2015 05:19 PM2015-12-04T17:19:27+5:302015-12-04T17:26:05+5:30
जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने शुक्रवारी सिरियामध्ये इसिस विरोधात सुरु असलेल्या लष्करी कारवाईमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
Next
ऑनलाईन लोकमत
बर्लिन, दि. ४ - जर्मन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने शुक्रवारी सिरियामध्ये इसिस विरोधात सुरु असलेल्या लष्करी कारवाईमध्ये सहभागी होण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. ५९८ संसद सदस्यांपैकी ४४५ सदस्यांनी इसिसवर कारवाईच्या बाजूने मतदान केले. १४६ सदस्यांनी विरोधात तर, सात सदस्य अनुपस्थित राहिले.
फ्रान्सची विमानवाहू युध्दनौका चार्ल्स डी च्या मदतीसाठी सहा टोरँडो जेट विमाने जर्मनी पाठवणार आहे. याशिवाय जर्मनीचे १२०० लष्करी जवान सहभागी होणार आहेत. इसिस विरोधातील मोहिमेमध्ये जर्मनी सहभागी होणार असली तरी, जर्मनीचा सहभाग मर्यादीत असणार आहे. जर्मनी ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आणि रशिया प्रमाणे इसिसच्या तळावर हवाई हल्ले करणार नाही.