बोंबला! केवळ ८७ रूपयात विकला १३५ खोल्यांचा महाल, राजकुमार वडिलांनी मुलावर केली केस....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:04 PM2021-02-20T13:04:50+5:302021-02-20T13:10:54+5:30
जर्मनमधील हनोवर शहरातील राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट ने आपला १३५ खोल्यांचा मॅरीनबर्ग महाल २००० साली आपला मुलगा अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरला सोपवला होता.
बर्लिनमध्ये राजकुमाराच्या मुलाने १३५ खोल्यांचा महाल केवळ ८७ रूपयांना विकला आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला. काहींना हे खोटंही वाटेल. पण हे खरं आहे. आता हा महाल वाचवण्यासाठी ६६ वर्षीय राजकुमाराने आपल्या ३७ वर्षीय मुला विरोधात कोर्टात गेला आहे.
जर्मनमधील हनोवर शहरातील राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट ने आपला १३५ खोल्यांचा मॅरीनबर्ग महाल २००० साली आपला मुलगा अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरला सोपवला होता. त्यांचा मुलगा ऑगस्ट ज्यूनिअरने २०१८ साली फारच कमी किंमतीत मॅरीनबर्ग महाल सरकारला विकण्याची घोषणा केली.
यानंतर अर्नस्ट ऑगस्ट ज्यूनिअरने महाल केवळ एक यूरो (८७ रूपये) मध्ये विकला. त्याने यामागे तर्क दिला की, महालाच्या बांधकामासाठी २३ मिलियन पाउंडची गरज होती. जे त्याच्याकडे नाहीत. मुलाच्या या निर्णयानंतर आता महाल वाचवण्यासाठी अर्नस्ट ऑगस्ट कायद्याचा आधार घेत आहेत आणि त्यांनी मुलाविरोधात केस केली आहे. त्यांनी आपल्या मुलावर गंभीर आरोप लावले आहेत आणि सोबतच महाल परत मागितला आहे.
मॅरीनबर्ग या महालाचं निर्माण १८६७ मध्ये करण्यात आलं होतं आणि राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट यांनी हा महाल २००० साली आपल्या मुलाकडे सोपवला होता. राजकुमार ऑगस्ट यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाने त्यांच्यासोबत दगा केलाय. मला न सांगता त्याने हा व्यवहार केला. त्यांनी आपल्या मुलावर अधिकार आणि हितांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावला आहे.
ते म्हणाले की, मुलाच्या या वागण्यामुळे त्यांना ऑस्ट्रियातील एखा लॉजमध्ये रहावं लागत आहे आणि ते आजारी असून सुद्धा त्यांना आर्थिक मदत मिळत नाहीये. राजकुमार अर्नस्ट ऑगस्ट हे नोवर राजवंशातील आहेत. ते ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे चुलत भाऊ आहेत.