जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 02:49 PM2023-08-18T14:49:56+5:302023-08-18T14:51:02+5:30

परदेशात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. अशा इच्छुकांसाठी जर्मनी चांगला पर्याय ठरू शकतो.

Germany trusts Indian youth; 60 to 80 lakh rupees salary is given in 'engineering' sector | जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार...

जर्मनीचा भारतीय तरुणांवर विश्वास; 'या' क्षेत्रात देताहेत 60 ते 80 लाख रुपये पगार...

googlenewsNext


नोकरीसाठी परदेशात जाण्याची अनेकांची इच्छा असते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये परदेशात जाण्याचे प्रमाण जास्त आहे. रोजगाराच्या उद्देशाने जर्मनी हा भारतीय तरुणांसाठी नेहमीच महत्त्वाचा आणि आकर्षक देश राहिला आहे. जर्मनीमध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे. इथे वृद्धांची संख्या जास्त आणि तरुणांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत व्यावसायिकांची नेहमीच कमतरता भासते. त्यामुळे जर्मनीमध्ये भारतीय तरुणांना चांगल्या संधी मिळतात. 

मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठीही अनेक भारतीय विद्यार्थी जर्मनीला जातात. तुम्हाला इंग्रजीसोबत जर्मन भाषा येत असेल, तर रोजगाराच्या जास्त संधी मिळतात. कामाच्या बाबतीत जर्मनीतील लोक भारतीयांवर जास्त विश्वास ठेवतात, म्हणूनच त्यांची पहिली पसंती भारतीयांना असते. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना जर्मनीमध्ये लाखो रुपयांमध्ये पगार मिळतो. हा आकडा 60-80 लाखापर्यंत जाऊ शकतो.

जर्मनीमध्ये कोणत्या क्षेत्रांना जास्त मागणी?
सध्या जर्मनीमध्ये नर्सिंग, इंजिनीअरिंग, आयटी, सेल्स, हॉटेल, चाइल्ड केअर यासह इतर अनेक क्षेत्रांना चांगली मागणी आहे. तुमचेही जर्मनीत जाण्याचे स्वप्न असेल, तर तुम्हीही या क्षेत्रात प्रयत्न करू शकता. भारतात आलेले जर्मनीचे कॉन्सुल जनरल अचिम फॅबिग सांगतात की, जर्मनीत नोकरी करण्याच्या अटी खूप शिथिल आहेत. आमच्याकडे विविध क्षेत्रात चार लाखांहून अधिक नोकऱ्या आहेत. भारतीय तरुणांनी रोजगारासाठी जर्मनीत यावे. नर्स, इलेक्ट्रिशियन, सोलर एनर्जी टेक्निशियनसह प्रत्येक लहान-मोठ्या क्षेत्रात रोजगार असल्याची माहिती त्यांनी दिली.

जर्मनीला जाण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा?
जर्मनीला गेल्यावर फसवणूक होऊन नये यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्व प्रथम आपले कौशल्य समजून घेणे महत्वाचे आहे. नंतर इंग्रजीसोबतच जर्मन भाषा यायला हवी. प्राथमिक स्तरावर जर्मन भाषा शिकण्यासाठी सहा महिने पुरेसे आहेत. नंतर ऑनलाइन पद्धतीने जर्मनीत नोकरीचा शोध घ्या. दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये एजन्सी आहेत, ज्या तुम्हाला मदत करू शकतात. 

Web Title: Germany trusts Indian youth; 60 to 80 lakh rupees salary is given in 'engineering' sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.