जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन

By admin | Published: June 16, 2017 11:23 PM2017-06-16T23:23:06+5:302017-06-16T23:23:06+5:30

आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचं निधन झालं

Germany's former Chancellor Helmut Cole passed away | जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन

जर्मनीचे माजी चान्सेलर हेलमुट कोल यांचं निधन

Next

ऑनलाइन लोकमत
जर्मनी, दि. 16 - आधुनिक जर्मनीचे प्रणेते समजले जाणारे हेलमुट कोल यांचं निधन झालं आहे. त्यांनी जर्मनीचं सर्वाधिक काळ चान्सेलर पद भूषवलं आहे. जर्मनीच्या एकीकरणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. शीतयुद्धाच्या काळात ते जगातील सर्वात आवडत्या नेत्यांमधील एक होते.

हेलमुट कोल 1982 ते 1998 सालापर्यंत जर्मनीच्या चान्सेलर पदावर कार्यरत होते. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी पूर्व आणि पश्चिम जर्मनीला एकत्रित केल्यामुळे त्यांना फादर ऑफ रि-युनिफिकेशनच्या नावानंही संबोधलं जातं. तसेच शीतयुद्धाच्या काळात शांतीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्लू बुश सीनियर यांनी 20व्या शतकातील सर्वात महत्त्वपूर्ण नेते म्हणून हेलमुट यांचा उल्लेख केला होता.

जर्मनीचं एकत्रीकरण केल्यानंतर 1990 ते 1998च्या कार्यकाळात त्यांनी देशाला प्रगतिपथावर नेत्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ख्रिश्चियन डेमोक्रेटिक युनियन पार्टीचे नेते हेलमुट कोल यांनी 16 वर्षं जर्मनी या देशाचे चान्सेलर पद सांभाळलं. जर्मनीचे निर्माता बिस्मार्कनंतरचे सर्वात मोठे नेते म्हणून हेलमुट कोल ओळखले जातात. 

 

Web Title: Germany's former Chancellor Helmut Cole passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.