मसूद अझहरवर बंदीसाठी जर्मनीचा ईयूमध्ये पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 02:34 AM2019-03-21T02:34:58+5:302019-03-21T02:35:19+5:30
जैश−ए−महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित क रण्यात यावे, असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे.
नवी दिल्ली - जैश−ए−महंमदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित क रण्यात यावे, असा पुढाक ार जर्मनीने युरोपियन युनियनमध्ये (ईयू) घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अशा मागणीचा मांडलेला प्रस्ताव चीनने अडवून ठेवल्यानंतर जर्मनीने हे पाऊ ल उचललेआहे, असेसूत्रांनी सांगितले.
२८ सदस्यांच्या युरोपियन युनियनने अझहरला जागतिक दहशतवादी जाहीर क रावे, यासाठी जर्मनी युनियनचे सदस्य असलेल्या
अनेक देशांच्या संपकर् ात आहे. तो दहशतवादी जाहीर झाला क ी, त्याच्यावर प्रवास बंदी येईल आणि त्याची २८ देशांतील संपत्ती गोठवली जाईल. जर्मनीने पुढाक ार घेतला असला तरी या मागणीसाठीचा प्रस्ताव मांडलेला नाही, असेराजनैतिक सूत्रांनी मंगळवारी सांगितले. युरोपियन युनियन मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठीच्या विषयावर सहमतीच्या तत्त्वांनुसार निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. १५ मार्च रोजी अझहर याच्यावर फ्रान्सने आर्थिक निर्बंध घातले आणि सांगितले क ी, युरोपियन भागीदारांसोबत मसूद
अझहर याचे नाव दहशतवादी कृत्यांत सहभागी असल्याबद्दलच्या युरोपियन युनियनच्या यादीत समाविष्ट क रण्यासाठी क ाम क रू . चीनने अझहरवरील प्रस्ताव अडवल्यानंतर दोन दिवसांनी फ्रान्सने वरील निर्णय घेतला. अझहरला दहशतवादी जाहीर क रावे, असा प्रस्ताव फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल−क ायदा निर्बंध समितींतर्गत मांडला होता.
पंधरापैक ी चौदा सदस्यांचा होता पाठिंबा
पुलवामात दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफ चे४० जवान ठार झाल्यानंतर वरील ठराव मांडण्यात आला होता. हा हल्ला आम्ही केल्याचा दावा जैश−ए− महंमदनेकेला होता. युनोच्या सुरक्षा परिषदेच्या १५ पैक ी १४ सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता; परंतु चीनने आपल्या नक ाराधिक ाराचा वापर क रू न तोअडवला.