ऑस्ट्रेलियामध्ये तयार होणार महाकाय ब्लॅक बॉक्स, या रहस्यमय तिजोरीत कैद होणार मानवाच्या अंत 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:43 PM2021-12-11T12:43:22+5:302021-12-11T12:47:41+5:30

Earth Black Box: ऑस्ट्रेलियामधील एका ठिकाणी स्कूलबसच्या आकाराची स्टीलची एक तिजोरी पृथ्वीवरील गरम होणाऱ्या हवामानाचा पॅटर्न रेकॉर्ड करणार आहे. ही मशीन पृथ्वीवर आम्ही जे काही करतोय, काय बोलतोय हेही ही मशीन ऐकणार आहे.

The giant black box will be made in Australia, the end of man will be imprisoned in this mysterious vault | ऑस्ट्रेलियामध्ये तयार होणार महाकाय ब्लॅक बॉक्स, या रहस्यमय तिजोरीत कैद होणार मानवाच्या अंत 

ऑस्ट्रेलियामध्ये तयार होणार महाकाय ब्लॅक बॉक्स, या रहस्यमय तिजोरीत कैद होणार मानवाच्या अंत 

Next

कॅनबेरा - ऑस्ट्रेलियामधील एका ठिकाणी स्कूलबसच्या आकाराची स्टीलची एक तिजोरी पृथ्वीवरील गरम होणाऱ्या हवामानाचा पॅटर्न रेकॉर्ड करणार आहे. ही मशीन पृथ्वीवर आम्ही जे काही करतोय, काय बोलतोय हेही ही मशीन ऐकणार आहे. या मशीनच्या निर्मात्यांनी सांगितले की, ही मशीन एक संग्रह तयार करणार आहे, जे मानवतेच्या चुकीच्या पावलांना एकत्र जोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या मशीनला पृथ्वीचा ब्लॅक बॉक्ससुद्धा म्हटले जात आहे. या मशीनची निर्मिती ऑस्ट्रेलियामधील एक द्विप असलेल्या टस्मानियामध्ये करण्यात येणार आहे.

ज्याप्रमाणे विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघात होण्यापूर्वी विमानामधील अंतिम क्षणांचे चित्रिकरण करतो त्याचप्रमाणे ही मशीन काम करेल.मात्र हा ब्लॅक बॉक्स उघडावा लागणार नाही. तीन इंच जाडीच्या स्टीलपासून बनलेल्या ३३ फूल लांब या तिजोरीचे काम पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता नाही. दरम्यान, याच्या निर्मात्यांनी सांगितले की, त्यांनी आधीपासूनच माहिती एकत्र करण्यास सुरुवात केली आहे.

पृथ्वीचा हा ब्लॅक बॉक्स वातावरणातील बदल आणि अन्य मानवनिर्मित धोके रेकॉर्ड करेल. तसेच मानवी संस्कृतीच्या पतनाची कहाणीही नोंद करेल. ३२ फूट उंचीच्या या ब्लॅक बॉक्सची निर्मिती कधी न तुटणाऱ्या स्टीलपासून करण्यात आली आहे. त्यामध्ये हवामानातील बदलांपासून, तापमान समुद्राची पातळी, हवामानातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण आणि इतर आकडे जमा केले जातील. या सर्वांचे दस्तऐवजीकरण केले जाईल, जेणेकरून मानवजात नैसर्गिक आपत्तींना रोखण्यामध्ये कशी अपयशी ठरली हे दाखवता येईल.

२०२२ च्यामध्यावर या ब्लॅक बॉक्सच्या निर्मितीचे कार्य सुरू होणार आहे. या प्रोजेक्टला मार्केटिंग कंपनी क्लेमेंगर बीबीडीओ युनिव्हर्सिटी ऑफ टस्मानियाच्या मदतीने चालवले जात आहे. कंपनीच्या मते याच्या निर्मितीचा हेतू हा पुढच्या काही वर्षांमध्ये पृथ्वीवरील मानव जमात नष्ट झाली, तर जे लोक वाचतील त्यांना याच्या माध्यमातून तेव्हा नेमके काय झाले होते हे समजेल.  

Web Title: The giant black box will be made in Australia, the end of man will be imprisoned in this mysterious vault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.