चकचकीत पांढ-या रंगाच्या दुर्मीळ हरणाशी झाली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 04:40 AM2017-08-17T04:40:55+5:302017-08-17T04:40:57+5:30
स्वीडनमध्ये ११ आॅगस्टच्या रात्री हॅन्स निलस्सोन निलस्सोन नावाच्या गृहस्थाने या पांढ-या हरणाला कॅमेºयात टिपले व त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न साकारले.
स्वीडनमध्ये ११ आॅगस्टच्या रात्री हॅन्स निलस्सोन निलस्सोन नावाच्या गृहस्थाने या पांढ-या हरणाला कॅमेºयात टिपले व त्यांचे आयुष्यभराचे स्वप्न साकारले. या हरणाला मूझ (उत्तर अमेरिकेतील हरणाची जात) म्हणतात. हॅन्स हे वॅर्मलँड काउंटीमध्ये मौजेखातर पायी फिरायला गेले होते. त्यांना छोट्या नदीतून हे दुर्मीळ हरीण जाताना दिसले. या वेळी सुदैवाने हॅन्स यांच्याकडे कॅमेरा होता. या पांढºया हरणाला युरोपमध्ये एल्क म्हणतात. वर्मलँड काउंटी भागात हे अत्यंत सुंदर व्हाइट मूझ १०० पेक्षा कमी संख्येने आहेत. हॅन्स यांनी या हरणाचा काढलेला व्हिडीओ फेसबुकवर १० हजारपेक्षा जास्त वेळा शेअर केला गेला आहे. अशा दुर्मीळ हरणाला एवढ्या जवळून बघण्याची संधी मिळाली. हा अनुभव खरोखर अविस्मरणीय आहे, असे हॅन्स यांनी म्हटले.