ट्रम्प यांच्या शपथविधीचे गिगापिक्सेल छायाचित्र
By admin | Published: January 25, 2017 12:55 AM2017-01-25T00:55:21+5:302017-01-25T00:55:21+5:30
एका वृत्तवाहिनीने गिगापिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची अल्ट्रा-हाय रिझोल्युशन, ३६० अंशांची छायाचित्रे शुक्रवारी टिपली.
एका वृत्तवाहिनीने गिगापिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची अल्ट्रा-हाय रिझोल्युशन, ३६० अंशांची छायाचित्रे शुक्रवारी टिपली. या तंत्रज्ञानाने गर्दीचे छायाचित्र काढल्यास गर्दीतील प्रत्येक व्यक्ती त्याच्या हावभावासह सुस्पष्ट पाहता येते. तुम्ही अगदी कोपऱ्यात असला तरी छायाचित्रात तुम्हीही स्वत:ला हुडकून काढू शकता.
संवादी छायाचित्र : हे संवादी छायाचित्र सोमवारी आॅनलाइन प्रसिद्ध झाले. ते कसे पाहायचे याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मुख्य छायाचित्राच्या खाली कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांची इन्सेटमध्ये छायाचित्रे दिली असून, त्यावर क्लिक केल्यास गर्दीचे छायाचित्र झूम इन होऊन त्या व्यक्तीला ठळकपणे समोर आणते. याशिवाय तुम्ही छायाचित्र डाव्या किंवा उजव्या बाजूला फिरवून झूम इन आणि झूम आऊट करू शकता. गिगापिक्सेल तंत्रज्ञानामुळे समारंभस्थळीचा प्रत्येक बारीकसारीक तपशील टिपता आला आहे. अगदी उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे हावभावही स्पष्ट दिसतात. काहींचे हावभाव गमतीशीर असून, ते पाहून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही.
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पाठीमागे बसलेल्या एका व्यक्तीने केलेला तोंडाचा चंबू नेटकऱ्यांमध्ये सध्या चर्चेचा विषय झाला आहे, असे गमतीशीर हावभाव तुम्हीही शोधू शकता. आहे नाही गमाडीगंमत.