वयाच्या 10 व्या वर्षी मुलगी गर्भवती, घरच्यांना ठाऊकच नाही; आई अन् बाळ दोघं सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 04:53 PM2021-06-27T16:53:23+5:302021-06-27T17:04:36+5:30

Girl Aged just 11 gives Birth : कमी वयात आई होणाऱ्या मुलींमध्ये प्री-एक्लेमप्सिया, वेळेआधीच प्रसूती होणं आणि विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका हो अधिक असतो.

girl aged just 11 gives birth and is believed to be britains youngest ever mother | वयाच्या 10 व्या वर्षी मुलगी गर्भवती, घरच्यांना ठाऊकच नाही; आई अन् बाळ दोघं सुखरूप

वयाच्या 10 व्या वर्षी मुलगी गर्भवती, घरच्यांना ठाऊकच नाही; आई अन् बाळ दोघं सुखरूप

Next

ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 11 वर्षांची मुलगी आई झाली आहे. ही मुलगी ब्रिटनमधील सर्वात लहान वयाची आई झाल्याचं म्हटलं जात आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, मुलगी गर्भवती असताना तिचं वय दहा वर्ष होतं. तिची प्रसूती झाली असून आई आणि बाळ दोघंही निरोगी असल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी गर्भवती असल्याचं तिच्या कुटुंबातील कोणालाही माहीत नव्हतं. मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर घरच्यांना धक्काच बसला आणि हे प्रकरण समजलं. सामाजिक संस्था या घटनेचा तपास करत आहेत. 

मुलीच्या कुटुंबीयांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी गर्भवती असल्याचा पत्ताच नसल्याने कुटुंबाला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. सध्या मुलीला तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. आई आणि बाळाची प्रकृती एकदम ठणठणीत आहे. ब्रिटनमध्ये अशा प्रकारच्या घटना या वारंवार समोर येत असून तेथील सरकार देखील यामुळे त्रस्त झालं आहे. लोकांनी तर ही चिंताजनक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये याआधी टेरेसा मिडलटन नावाची लहान मुलगी आई झाली होती. त्यावेळी तिचं वय 12 वर्षे होतं.

टेरेसा मिडलटनने 2006 मध्ये मुलाला जन्म दिला होता. डॉक्टर कैरल कूपर यांनी द सनशी केलेल्या चर्चा केली आहे. त्यावेळी दिलेल्या माहितीनुसार, "ही आतापर्यंतची सर्वात कमी वयाची आई आहे. कमी वयात आई होणाऱ्या मुलींमध्ये प्री-एक्लेमप्सिया, वेळेआधीच प्रसूती होणं आणि विविध प्रकारच्या संसर्गाचा धोका हो अधिक असतो" ब्रिटनमध्ये 2014 मध्ये एका बाळाचा जन्म झाला होता. त्याच्या आईचं वय 12 वर्ष होतं. तर वडिलांच वय 13 वर्ष होतं. हे दोघं ब्रिटनमधील सर्वात कमी वयाचे आई-वडील झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 बापरे! 4 महिने 'तो' कोरोनाशी लढला, बरा झाला अन् रुग्णालयाने दिलेलं 21 कोटींचं बिल पाहून हैराण झाला

कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सर्वच सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहेत. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरू असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. अमेरिकेत अशीच एक घटना घडली आहे. टिकटॉक (Tiktok) या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर एका व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करून त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी आलेला खर्च लोकांना सांगितला आहे. कोरोनामुळे तो 4 महिने रुग्णालयात दाखल होता. त्या कालावधीतील त्याचं बिल तब्बल 20 कोटी 77 लाख रुपये आलं आहे. 

Web Title: girl aged just 11 gives birth and is believed to be britains youngest ever mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.