मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:15 PM2019-10-30T16:15:29+5:302019-10-30T16:16:15+5:30

मैत्रिसाठी प्रसंगी जीवपण देऊ असं अनेकजण म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली की मैत्रिसाठी प्राण पणाला लावणारे फार थोडे असतात.

Girl fight with crocodile to Save the life of her friend | मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात   

मैत्रिसाठी कायपण! मैत्रिणीचा जीव वाजवण्यासाठी तिने मगरीशी केले दोन हात   

Next

मैत्रिसाठी प्रसंगी जीवपण देऊ असं अनेकजण म्हणतात. मात्र प्रत्यक्षात तशी वेळ आली की मैत्रिसाठी प्राण पणाला लावणारे फार थोडे असतात. मात्र आपल्या मैत्रिणीचे प्राण वाचवण्यासाठी  एका ११ वर्षीय मुलीने जे काही केले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  मैत्रिणींसह तलावात पोहत असताना या मुलीच्या एका मैत्रिणीवर मगरीने हल्ला केला. मात्र या ११ वर्षीय मुलीने मैत्रिणीचा जीव वाचवण्यासाठी चक्क मगरीशी दोन हात केले.

ही घटना झिम्बाव्वेमधील सिंड्रेला या गावात घडली आहे. रेबेका मुंकोंब्वे असे या धाडसी मुलीचे नाव आहे. रेबेकाची मैत्रिण लाटोया मुवानी आपल्या काही मैत्रिणींसमवेत गावाजवळ असलेल्या नदीत पोहत होती. त्यावेळी एका मगरीने तिच्यावर हल्ला केला. ही मगर लाटोयाला ओढत नदीत खोलवर घेऊन जाऊ लागली. 

तेवढ्यात आरडाओरडा ऐकून सावध झालेल्या रेबेका हिने धाडस करून मगरीच्या पाठीवर उडी मारली. मगरीने लाटोयाचा हात आणि पाय पकडून ठेवला होता. दरम्यान, मगरीच्या पाठीवर स्वार झालेल्या रेबेकाने मगरीवर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात केली. तिने मगरीच्या डोळ्यांवर वार करण्यासा सुरुवात केली. मगरीने लाटोयाला सोडेपर्यंत ती वार करतच राहिली. अखेरीस रेबेकाच्या निर्धारापुढे मगरीची शक्ती कमी पडली आणि ती लाटोयाला सोडून निघून गेली. 

दरम्यान, या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रेबेकाने सांगितले की, ''आम्ही सर्व मैत्रिणी गावाजवळील नदीत पोहत होतो. तेवढ्याच एका मगरीने लाटोयावर हल्ला केला. या सर्व मुलींमध्ये मीच सर्वांत मोठी होते. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी मी नदीत उडी घेतली. मगरीने लाटोयाचा हात आणि पाय पकडून ठेवला होता. अखेर मगरीने तिला सोडून दिल्यानंतर मी लाटोयासोबत पोहत किनाऱ्यावर आले. मात्र तोपर्यंत मगरीने आमच्यावर पुन्हा हल्ला केला नाही.''

मगरीशी झुंज दिल्यानंतरही रेबेकाला फार दुखापत झाली नाही. मात्र तिची मैत्रीण असलेल्या लाटोयाला किरकोळ जखमा झाल्या आहेत. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तिच्यावर उपचार सुरू आहेत.  

Web Title: Girl fight with crocodile to Save the life of her friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.