तरुणाच्या डोक्यातून आरपार गेलेल्या गोळीने मैत्रिणीचा मृत्यू !

By Admin | Published: May 25, 2017 07:06 PM2017-05-25T19:06:30+5:302017-05-25T19:15:37+5:30

एका प्रेमी युगुलातील तरुणाने आत्महत्या करण्यासाठी स्वत:वर झाडून घेतलेली गोळी त्याच्या कवटीतून आरपार जाऊनही तो वाचला

Girl shot dead in front of woman! | तरुणाच्या डोक्यातून आरपार गेलेल्या गोळीने मैत्रिणीचा मृत्यू !

तरुणाच्या डोक्यातून आरपार गेलेल्या गोळीने मैत्रिणीचा मृत्यू !

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 25 - एका प्रेमी युगुलातील तरुणाने आत्महत्या करण्यासाठी स्वत:वर झाडून घेतलेली गोळी त्याच्या कवटीतून आरपार जाऊनही तो वाचला. पण त्याच्या डोक्यातून बाहेर पडलेली गोळी शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या मैत्रिणीला लागून तिचा मृत्यू झाल्याची विचित्र आणि करुण घटना अमेरिकेत घडली आहे.

अलास्का राज्यातील अँकरेज शहरात काही दिवसांपूर्वी घडलेली ही घटना त्यासंबंधीचा खटला न्यायालयात आल्यावर उघड झाली. आत्महत्येतून वाचलेल्या या तरुणाला गेल्या रविवारी न्यायालयात उभे केले गेले आणि ग्रॅण्ड ज्युरीने त्याला सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरविले. त्यास न्यायालय नंतर शिक्षा ठोठावेल. या दुर्दैवी घटनेतील २२ वर्षांच्या तरुणाचे नाव व्हिक्टर सिबसन असे असून त्याच्याकडून जिचा चुकून मृत्यू झाला ती ब्रिटनी-मे हॅग ही त्याची मैत्रीण २२ वर्षांची होती. ही घटना घडल्यानंतर सिबसन स्वत:हून अँकरेज पोलिसांपुढे हजर झाला व त्यानंतर त्याच्यावर हा खटला उभा राहिला.

प्रॉसिक्युटरने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रानुसार गेल्या महिन्यात ही घटना घडली त्या दिवशी अँकरेज शहराच्या मिडटाऊन भागातील एका हौसिंग कॉम्प्लेक्समधील क्लबमधून पोलिसांना ‘९११’ या नंबरवर इमर्जंसी कॉल आला. पोलीस तेथे पोहोचले तेव्हा त्यांना व्हिक्टर आणि ब्रिटनी बुंदुकीच्या गोळीने गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत दिसले. दोघांनाही इस्पितळात हलविण्यात आले. पण त्या दिवशी नंतर ब्रिटनीचा मृत्यू झाला. व्हिक्टर आणि ब्रिटनी या दोघांच्याही शरीरांत एकच गोळी घुसल्याचे तपासातून निष्पन्न झाल्याचे न्यायालयास सांगताना सहाय्यक जिल्हा प्रॉसिक्युटर जेम्स फायेट यांनी नमूद केले की, व्हिक्टरच्या डोक्याच्या डाव्या बाजूस गोळी आत शिरल्याची तर कवटीच्या वरच्या भागात गोळी बाहेर पडल्याची जखम उत्तरीय तपासणीत आढळून आली. व्हिक्टरच्या डोक्यातून आरपार बाहेर पडलेली गोळी ब्रिटनीच्या महत्वाच्या अवयवांत घुसून तिचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष फॉरेन्सिक तज्ज्ञांनी काढला असल्याचेही प्रॉसिक्युटर फायेट यांनी न्यायालयास सांगितले.

Web Title: Girl shot dead in front of woman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.