फूड डिलिव्हरी करण्यासाठी मुलीचा 30000 किमी प्रवास, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:44 PM2022-11-19T12:44:21+5:302022-11-19T12:48:19+5:30
जगातील सर्वात लांब अंतरावरील फूड डिलिव्हरी म्हणून याकडे पाहिले जात आहे.
सध्या डिजिटल काळ सुरू झाले आहे. या काळात ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याचा ट्रेंड सुद्धा वाढला आहे. कंपन्या काही मिनिटांत तुमच्या पत्त्यावर इच्छित खाद्यपदार्थ पोहोचवतात. पण, एका मुलीने खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी 30,000 किलोमीटरचे अंतर कापले. हे करून तिने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
चेन्नईची रहिवासी असलेल्या मानसा गोपाल (Maanasa Gopal) हिने अंटार्क्टिकामध्ये फूड डिलिव्हरी करण्यासाठी केलेल्या प्रवासाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.फूड डिलिव्हरीसाठी 4 महाद्वीप पार करून सिंगापूरहून अंटार्क्टिकाला पोहोचली होती, असे व्हिडीओमध्ये मानसा गोपालने सांगितले आहे.
जगातील सर्वात लांब अंतरावरील फूड डिलिव्हरी म्हणून याकडे पाहिले जात आहे. तिने फूड पॅकेट्स घेऊन 30,000 किलोमीटरचा प्रवास कसा केला, हे व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले आहे. तिचा प्रवास सिंगापूरपासून सुरू झाला. यानंतर ती हॅम्बर्ग (जर्मनी) येथे पोहोचली. त्यानंतर ब्युनोस (अर्जेंटिना) मार्गे मानसा अंटार्क्टिकाला पोहोचली आणि ग्राहकांपर्यंत फूड पोहोचवले.
या व्हिडीओमध्ये मानसा अनेक बर्फाळ आणि चिखलमय रस्ते पार करताना दिसून येत आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, "मी सिंगापूर ते अंटार्क्टिकाला खास फूड डिलिव्हरी केली. हा अप्रतिम प्रवास लोकांसोबत शेअर करायला खूप उत्सुक आहे." दुसर्या पोस्टमध्ये, मानसाने सांगितले की, "2021 पासून मी अंटार्क्टिक मोहिमेसाठी पैसे गोळा करण्याचा प्रयत्न करत होती. गेल्या महिन्यात फूड पांडा (@foodpandasg) ने माझी ट्रिप स्पॉन्सर केली."
दरम्यान, मानसा गोपालच्या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विचारले- तुम्ही कोणत्या फूडची डिलिव्हरी केली? दुसर्याने लिहिले - अविश्वसनीय. तर आणखी एका युजर्सने म्हटले की, आश्चर्यकारक, इतकी लांब डिलिव्हरी.