‘ऑनर किलिंग’मधून पाक तरुणी बचावली
By admin | Published: June 8, 2014 12:33 AM2014-06-08T00:33:50+5:302014-06-08T00:33:50+5:30
मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त पित्याने तिला गोळी घालून कॅनॉलमध्ये फेकून दिले; मात्र दैव बलवत्तर असल्याने ही 18 वर्षीय पाकिस्तानी तरुणी बचावली.
Next
>इस्लामाबाद : मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त पित्याने तिला गोळी घालून कॅनॉलमध्ये फेकून दिले; मात्र दैव बलवत्तर असल्याने ही 18 वर्षीय पाकिस्तानी तरुणी बचावली. प्रेमविवाहावरून एका 25 वर्षीय गर्भवती विवाहितेचा तिच्या कुटुंबियांनीच बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच ‘ऑनर किलींग’च्या प्रयत्नाची घटना घडल्यामुळे सरकार हादरून गेले आहे.
पोलीसांनी सांगितले की, ही घटना हफिजाबाद येथे घडली. साबा मकसूद नावाची एक व्यक्ती त्याच्या जवळच्या गावातील मुलीच्या प्रेमात पडला होता. मागील आठवडय़ात दोघांनीही विवाह केला; परंतु हे लग्न मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हते. मुलीचा पिता अहमद याने मुलीला इजा पोहोचविणार नसल्याच्या अटीवर मकसूद याच्या घरून तिला घरी आणले. त्यानंतर पिता व नातेवाईकांनी तिला मारहाण केली व निर्मनुष्य ठिकाणी नेले. अकबर यांनी तरुणीच्या चुलत्यांसमक्ष तिच्यावर गोळी झाडली. मुलीचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी तिला पोत्यात गुंडाळून कॅनॉलमध्ये फेकून दिले; परंतु ती बेशुद्ध पडली होती. शुद्धीवर आल्यावर तिने सुटका करून घेतली. (वृत्तसंस्था)
4प्रेमविवाह केल्याने पाकिस्तानी पित्याने गर्भवती मुलगी फरजाना (27) हिची दगडाने ठेचून हत्या केली होती. ऑनर किलिंगच्या या प्रकरणात दहशतवादविरोधी न्यायालयाने आरोपी पिता मुहंमद अजीम याची कारागृहात रवानगी केली आहे. गेल्या आठवडय़ात लाहोरमध्ये ती घटना घडली होती.