गर्लफ्रेंड फोटो काढत राहिली अन् डोळ्यासमोर बॉयफ्रेंड तडफडून मरण पावला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 17:49 IST2023-06-01T17:48:00+5:302023-06-01T17:49:02+5:30
जोडपे समुद्रकिनारी फिरायला गेले होते, यावेळी एका घटनेने त्यांचे आयुष्य बदलले.

गर्लफ्रेंड फोटो काढत राहिली अन् डोळ्यासमोर बॉयफ्रेंड तडफडून मरण पावला...
कपल अनेकदा फिरायला बीचवर जातात. तिथे एकमेकांसोबत वेळ घालवतात, सोबत फोटो काढतात, तो क्षण आनंदाने घालवतात. पण, एका जोडप्याला बीचवर फिरायला जाणे खूप महागात पडले. त्यांना कल्पनाही नव्हती की, काही वेळातच त्यांचे आयुष्य बदलणार आहे. त्या घटनेमुळे तरुणीला जबर धक्का बसला. जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
मीडिया रिपोर्टनुसार, हे प्रकरण ग्रीसचे आहे. यूकेच्या लिव्हरपूलमध्ये राहणारे स्कॉट आणि त्याची गर्लफ्रेंड सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ग्रीसला गेले होते. ते समुद्रकिनारी फिरत होता. यावेळी तरुणी स्कॉटचे फोटो काढत होती. यावेळी अचानक स्कॉवर वीज पडली. स्कॉटवर वीज पडली तेव्हा त्याची गर्लफ्रेंड समोरच होती. तिच्या डोळ्यासमोर स्कॉटचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, वादळ आले होते, यावेळी सर्वजण इकडे-तिकडे धावले. पण, चवेळी स्कॉट पाण्यात पॅडल बोर्डिंग करत होता. स्कॉटची गर्लफ्रेंड त्याचे फोटो क्लिक करत होती. काही लोकांनी त्या जोडप्याला पाण्यातून बाहेर येण्यास सांगितले, पण स्कॉटने ऐकले नाही. काही वेळातच त्याच्यावर वीज कोसळली. या घटनेनंतर स्कॉटला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.