Afghanistan Crisis: तालिबानी पत्नीच्या शोधात; वडिलांच्या डोळ्यादेखत २१ वर्षांच्या मुलीला पळवून नेले!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:10 AM2021-08-26T11:10:02+5:302021-08-26T11:14:35+5:30

Afghanistan Crisis: तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे.

Girls and women are most at risk after the Taliban came to power. | Afghanistan Crisis: तालिबानी पत्नीच्या शोधात; वडिलांच्या डोळ्यादेखत २१ वर्षांच्या मुलीला पळवून नेले!

Afghanistan Crisis: तालिबानी पत्नीच्या शोधात; वडिलांच्या डोळ्यादेखत २१ वर्षांच्या मुलीला पळवून नेले!

googlenewsNext

काबुल : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर  (Afghanistan) कब्जा केल्यापासून या देशात सर्व काही बदलले आहे. येथील जास्तीत जास्त लोकांना कसेही करून देश सोडायचा आहे. अफगाणिस्तानमधून बाहेर जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे काबुल विमानतळ (Kabul Airport). येथील सुरक्षा अमेरिकन सैनिकांची आहे. काबुल विमानतळावर अफगाणिस्तान सोडू इच्छिणाऱ्या जवळपास अडीच लाख लोकांची गर्दी आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, भुकेने व्याकुळ असलेल्या लोकांना विमानतळावरच आपला जीव गमवावा लागत आहे.

तालिबानची सत्ता आल्यानंतर सर्वात जास्त धोका मुली आणि महिलांच्या जीवाला आहे. तालिबानी आता नागरिकांच्या घरात घुसून मुलींना घेवन जात आहेत. तालिबानी मुलींच्या इच्छे विरूद्ध लग्न करत आहेत तर काही मुलींना त्यांनी दुसऱ्या देशात पाठवलं आहे. नुकताचं तालिबानी बदख्शां प्रांतातील एका गावात पोहोचले आणि वडिलांच्या डोळ्यादेखत त्यांनी २१ वर्षांच्या मुलीला पळवून घेवून गेले. याबाबतची वृत्त 'द सन'ने पत्रकार होली मैके (Hollie McKay)यांनी दिले आहे. 

अफगाणी मुलगी फरीहा ईजरच्या मैत्रीणीसोबत देखील असचं झालं आहे. फरिहाने पत्रकार मके यांना सांगितले की, काही दहशतवादी बदख्शां प्रांतात राहणाऱ्या तिच्या मित्रीणीच्या घरी पोहोचले आणि जबरदस्तीने तिला सोबत नेले. दहशतवाद्यांनी मुलीच्या वडिलांना सांगितले की आम्ही इस्लामचे रक्षक आहोत आणि तुमची मुलगी आम्हाला पत्नी म्हणून हवी आहे. तालिबानी सर्वांच्या घरात जावून पत्नीच्या शोधात आहेत. जी मुलगी त्यांना आवडते तालिबानी त्या मुलीला इच्छेविरूद्ध घेवून जात आहेत. 

आतापर्यंत २० जणांचा मृत्यू

जेवण आणि पाण्याच्या वाढत्या किंमतीमुळे लोकांना भुकेल्या पोटावर उन्हात उभे राहण्यास भाग पडत आहे. त्यामुळे या लोकांचे शरीर कमकुवत होत असून आणि ते बेशुद्ध पडत आहेत. लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे. मारहाण करत आहे. काबुल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आले

आतापर्यंत काबुलमधून ८२,३०० लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. काबुलमध्ये सुमारे ६,००० अमेरिकन आढळले आहेत. त्यापैकी ४५०० लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. तालिबानने अलीकडेच म्हटले आहे की, जर अमेरिकेने ३१ ऑगस्टपर्यंत आपले अभियान थांबविले नाही, तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात.

Web Title: Girls and women are most at risk after the Taliban came to power.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.