अमेरिकेला गतवैभव मिळवून देईन

By Admin | Published: November 10, 2016 05:06 AM2016-11-10T05:06:51+5:302016-11-10T05:06:51+5:30

सर्व अमेरिकनांचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची प्रतिज्ञा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. कटू आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचार मोहिमेनंतर फुटीच्या जखमांवर फुंकर घालण्याच्या इराद्याने ट्रम्प

Give America a Great Gift | अमेरिकेला गतवैभव मिळवून देईन

अमेरिकेला गतवैभव मिळवून देईन

googlenewsNext

न्यूयॉर्क : सर्व अमेरिकनांचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची प्रतिज्ञा डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी केली. कटू आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचार मोहिमेनंतर फुटीच्या जखमांवर फुंकर घालण्याच्या इराद्याने ट्रम्प यांनी वरील प्रतिज्ञा केली. त्यांनी देशभरातील रिपब्लिकन, डेमोक्रॅट नेत्यांसह अपक्षांना एकजुटीने सोबत चालण्याचे आवाहन केले. विजयी भाषणात त्यांनी धोरणात्मक मुद्द्यांचा उल्लेख टाळला. प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना शुभेच्छा देताना हिलरी यांनी कडवी झुंज दिल्याचे ते म्हणाले.
ट्रम्प आणि हिलरी यांच्यात प्रचार मोहिमेदरम्यान अनेकदा कटू वादविवाद झाला. प्रचार कधी नव्हे एवढ्या खालच्या पातळीला गेला होता. प्रचार मुख्यालयात समर्थकांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, हिलरी यांनी खूप काम केले. त्यांच्या देशसेवेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. या वेळी ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया आणि मुले, तसेच उपराष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार माइक पेन्स आदी उपस्थित होते.
अमेरिकेने फुटीचे तडे लिपून एकजूट होण्याची वेळ आली आहे. मी सर्व रिपब्लिकन, डेमोक्रॅट आणि अपक्षांना एकजुटीचे आवाहन करतो, असे ते म्हणाले. मी या देशाच्या प्रत्येक नागरिकाला वचन देतो की, मी सर्व अमेरिकनांचा राष्ट्राध्यक्ष बनेन. मला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेणाऱ्या लोकांनाही मी आवाहन करतो की, त्यांनी मला मार्गदर्शन करावे. आपल्या महान देशाला एकजूट करण्यासाठी मला त्यांची मदत हवी आहे. मी सुरुवातीपासून म्हणत होतो की, ही आमची मोहीम नव्हती, तर देशावर प्रेम करणाऱ्या, तसेच आपल्या कुटुंबीयांसाठी उज्ज्वल भविष्याची कामना करणाऱ्या लाखो मेहनती महिला आणि पुरुषांची मोहीम होती.


1946

मध्ये जन्मलेल्या ट्रम्प न्यूयॉर्कमधील स्थावर मालमत्ता व्यावसायिक फ्रेड ट्रम्प यांचे चौथे चिरंजीव. त्यांचा जन्म क्वीन्समधील. ते व्हॉर्टन स्कूलमध्ये गेले. नंतर ते कंपनीत दाखल व्हायच्या आधी वडिलांकडून एक दशलक्ष अमेरिकन डॉलरचे कर्ज घेऊन या व्यवसायात आले. १३ वर्षांचे असताना ट्रम्प लष्करी शाळेत गेले आणि १९६४ मध्ये त्यांनी मिलीट्री अकॅडमीतून पदवी मिळविली.

1987 मध्ये ट्रम्प
यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा विचार केला होता, असे काहींना वाटते. तथापि, २०११ मध्ये पत्रकारांसोबतच्या मेजवानीदरम्यान त्यांचा हा विचार अधिक प्रबळ झाला, असे काहींचे म्हणणे आहे.

1971 मध्ये ट्रम्प मॅनहॅटन येथील एका बांधकाम प्रकल्पात सहभागी झाले होते. हा प्रकल्प यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्यांनी तोट्यातील कमोडोर हॉटेल ७ कोटी डॉलरला विकत घेतले आणि नंतर १९८० मध्ये त्यांनी हे हॉटेल ‘द ग्रँड हयात’ या नावाने पुन्हा सुरू केले.

1982मध्ये ट्रम्प यांनी न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प टॉवर उभारले.
ही न्यूयार्कमधील प्रसिद्ध गगनचुंबी इमारत आहे.
या इमारतीच्या बांधकामासाठी ट्रम्प यांनी पोलंड येथून
बेकायदेशीररित्या मजूर आणले होते.

1980-1990 हे दशक ट्रम्प यांच्यासाठी तोट्याचे राहिले. त्यांना प्रत्येक व्यवसायात तोटा
झाला. त्यांच्यावर ९७५ दशलक्ष डॉलरचे वैयक्तिक
कर्ज झाले. ते दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होते.

काही बँकांनी त्यांना मदत करीत नवे कर्ज
दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी यशाची
नवनवी शिखरे पादाक्रांत केली.

1999 मध्ये त्यांनी राजकारणातही उडी घेत रिफॉर्म पार्टी स्थापन केली. २००० मध्ये या पक्षाने आपल्याला अध्यक्षपदाचे उमेदवार बनवावे, अशी त्याची मनीषा होती. तथापि, पक्षातील अंतर्गत वादाला कंटाळून ट्रम्प फेब्रुवारी २००० मध्ये ते राजकारणातून बाहेर पडले.

2016
मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवून ती जिंकली.

न्यूयॉर्कयेथील रहिवासी ट्रम्प
हे रिअल इस्टेट व्यावसायिक.
ते अमेरिकेचे आता अब्जाधीश राष्ट्राध्यक्ष होणार आहेत.

सर्वाधिक
वयाचे राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प अमेरिकेचे सर्वात बुजूर्ग राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. सध्या ट्रम्प ७० वर्षांचे आहेत. यापूर्वी अमेरिकेत रोनाल्ड रिगन हे सर्वाधिक वयाचे राष्ट्राध्यक्ष होते. रिगन राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा ते ६९ वर्षांचे होते. ट्रम्प त्यांच्याहून एक वर्षाने मोठे आहेत.

गव्हर्नर नसलेले पहिले राष्ट्राध्यक्ष
ट्रम्प हे गव्हर्नर न राहिलेले ६० वर्षांतील पहिले राष्ट्राध्यक्ष असतील. यापूर्वी गव्हर्नरपद न भुषविलेले ड्विट आयझनहावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते.

तीन विवाह
ट्रम्प यांचे आतापर्यंत तीन विवाह झाले. इवाना व मार्ला यांच्यासोबत घटस्फोट झाला. मेलानिया त्यांची जोडीदार आहे. ट्रम्प यांना तीन मुलगे, दोन मुली आहेत.

Web Title: Give America a Great Gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.