मूल जन्माला घाला, दोन वर्षे पगारी सुट्टी घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 05:12 AM2021-06-02T05:12:57+5:302021-06-02T05:13:18+5:30
जगभरातले अनेक देश आता ‘ग्रेइंग पॉप्युलेशन’- म्हणजे वेगाने म्हातारी होत चाललेली लोकसंख्या या प्रश्नाने त्रस्त आहेत.
जगभरातले अनेक देश आता ‘ग्रेइंग पॉप्युलेशन’- म्हणजे वेगाने म्हातारी होत चाललेली लोकसंख्या या प्रश्नाने त्रस्त आहेत. चीनने तीन मुले जन्माला घालण्याची ‘परवानगी’ जोडप्यांना दिली असल्याची बातमी तुम्ही वाचली असेलच. त्या पार्श्वभूमीवर मूल जन्माला घालण्यासाठी सरकारांनी देऊ केलेले ‘फायदे’ही आता चर्चेत येत आहेत. त्यातच महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रसूतीनंतर अपत्य संगोपनासाठी नवजात मातांना मिळणारी भरपगारी सुट्टी! इस्टोनिया या देशात नवजात आयांना तब्बल ८५ आठवड्यांची भरपगारी सुट्टी मिळते. अमेरिकेतल्या आया मात्र सर्वांत दुर्दैवी. त्यांच्यासाठी या अशा भरपगारी सुट्टीची काही सोयच नाही! अमेरिका या आयांना १२ आठवड्यांची सुट्टी देते, पण ती बिनपगारी!!
कोणत्या देशात किती आठवड्यांची प्रसूतिरजा? (मूल जन्माला घातल्यावर / दत्तक घेतल्यावर मिळणाऱ्या भरपगारी सुट्टीचा कालावधी)