अधिक मुले जन्माला घाला; आम्ही पोषणासाठी पैसे देऊ, चीनमधील फंडा, जास्त मुलांना प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 07:56 AM2021-07-31T07:56:32+5:302021-07-31T07:57:17+5:30
China News: सिचुआनच्या दक्षिण- पश्चिम प्रांतात पंजिहुआ शहराच्या प्रशासनाने घोषणा केली आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांना जन्म दिल्यास स्थानिक कुटुंबांना दरमहा ५०० युआन (५७०० रुपये) प्रति मुलासाठी देण्यात येतील.
बीजिंग : देशातील तरुणांची संख्या वाढावी यासाठी चीन प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आता सिचुआनच्या दक्षिण- पश्चिम प्रांतात पंजिहुआ शहराच्या प्रशासनाने घोषणा केली आहे की, दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलांना जन्म दिल्यास स्थानिक कुटुंबांना दरमहा ५०० युआन (५७०० रुपये) प्रति मुलासाठी देण्यात येतील. (Give birth to more children; We will pay for nutrition, funds in China, more children preferred)
लहान मुलाच्या पालनपोषणासाठी देण्यात येणारी ही रक्कम तीन वर्षांपर्यंत मिळणार आहे. स्टील उद्योगासाठी या शहराची ओळख आहे. १२ लाख लोकसंख्येच्या या शहरात आता नोंदणी करणाऱ्या महिलांना, मातांना मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी सरकार अधिक नर्सरी स्कूल सुरू करणार आहे.
जन्मदर घसरला
या महिन्याच्या सुरुवातीलाच चीन सरकारने घोषणा करत २०२५ पर्यंतच्या मुलांच्या जन्म, पालनपोषण आणि शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिलेले आहे. कोरोना साथीच्या काळात गतवर्षी चीनमध्ये जन्मदर सहा दशकांच्या नीचांकावर गेला आहे.