अमेरिकेतील पीडित भारतीयांना जलद न्याय देऊ
By admin | Published: March 7, 2017 04:08 AM2017-03-07T04:08:51+5:302017-03-07T08:56:37+5:30
द्वेषातून हल्ले झालेल्या प्रकरणात भारतीय अमेरिकी पीडितांना जलदगतीने न्याय देऊ, असा शब्द अमेरिकेने भारताला दिला आहे
वॉशिंग्टन : द्वेषातून हल्ले झालेल्या प्रकरणात भारतीय अमेरिकी पीडितांना जलदगतीने न्याय देऊ, असा शब्द अमेरिकेने भारताला दिला आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूतांनी या घटनांबाबत चिंता व्यक्त केली.
हरनीश पटेल (४३) हे गुुरुवारी आपल्या घराच्या बाहेर मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या. पटेल हे दक्षिण कॅरोलिनात एका स्टोअरचे मालक होते. तर, दीप राय (३९) यांना त्यांच्या घराच्या बाहेर गोळी मारण्यात आली होती. अशाच प्रकारची घटना श्रीनिवास कुचिभोटला या इंजिनिअरच्या बाबती घडली होती.
एका व्यक्तीने त्यांना गोळी मारली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मित्र आलोक मदसानी हे यात जखमी झाले. अशा प्रकारच्या घटना रोखायला हव्यात अशी अपेक्षा भारतीय राजदूत नवतेज सरना यांनी व्यक्त केली. (वृत्तसंस्था)