मित्रासोबत मिळून महिलेने बॅंकेत केला मोठा घोटाळा, तिजोरीत कागद भरून कोट्यवधी रूपये घेऊन फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:25 PM2022-07-30T15:25:21+5:302022-07-30T15:28:35+5:30
Crime News : इथे एका सुंदर महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून त्या बॅंकेट लूट केली जिथे ती अनेक वर्षांपासून काम करत होती. ती तिथे केवळ काम तर करतच होती, पण सोबतच बॅंकेच्या मालकांपैकी एक होती.
Russia : जगभरात रोज फसवणुकीच्या, लुटीच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. छोटे-मोठे चोर काही रूपयांची हेराफेरी करून शांत बसतात. पण काही ठग हे मोठा कारनामा करतात. चार वर्षाआधी रशियातून लुटीची एक अशीच धक्कादायक घटना समोर आली होती. इथे एका सुंदर महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून त्या बॅंकेट लूट केली जिथे ती अनेक वर्षांपासून काम करत होती. ती तिथे केवळ काम तर करतच होती, पण सोबतच बॅंकेच्या मालकांपैकी एक होती. तिचा साथीदारही याच बॅंकेच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सपैकी एक होता.
इनेसा ब्रांडेनबुर्ग (Inessa Brandenburg) हे नाव ठगांच्या लिस्टमध्ये खूप वर येतं. तिने बॅंकेतून साधारण 67 कोटी 49 लाख रूपये लंपास केले होते आणि त्याजागी कागदांचे तुकडे तिजोरीत ठेवले होते. ही चोरी समोर येईपर्यंत इनेसा प्रायव्हेट जेटने देशाबाहेर गेली होती. अनेक वर्षांपासून तिचा शोध घेतला जात होता. ज्यानंतर गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये तिला स्पेनमध्ये पकडण्यात आलं. आता तिला परत रशियात सुनावणीसाठी आणलं जात आहे.
इनेसाने जानेवारी 2018 मध्ये ही चोरी केली होती. तिने ट्यूमेनच्या सायबेरियन बॅंक ऑफ रिकंस्ट्रक्शन अॅन्ड डेव्हलपमेंटमधून पैसे चोरी केले होते. त्यानंतर ती देश सोडून फरार झाली होती. बॅंकेच्या क्लार्कला तिजोरीत पैशांच्या जागी कागदांचे तुकडे दिसले. त्यानंतर लगेच तपास सुरू केला गेला आणि समोर आलं की, इनेसाने सगळे पैसे लंपास करून त्याजागी कागदांचे तुकडे ठेवले होते. पैसे स्पोर्ट्स बॅगमध्ये भरून ती बॅंकेतून गेली होती. हे सगळं समजण्याआधीच इनेसा प्रायव्हेट जेटने देशातून बाहेर गेली होती. तिला चार वर्षांपासून शोधलं जात होतं.
इनेसा या चोरीमध्ये एकटी नव्हती. या चोरीत तिच्यासोबत याच बॅंकेतील को-ओनर आणि बोर्ड चेअरमॅन रोमान्यता सहभागी होता. इनेसाची बॅंकेत जी पोस्ट होती, त्याच मदतीने तिने एक्स्ट्रा कॅश सप्लाय करण्याची रिक्वेस्ट टाकली होती. इनेसाने लोकांना कमी व्याजाने पैसे देऊन त्यांचं लक्ष आपल्याकडे खेचण्यासाठी ही स्कीम समोर आणली होती. अशाप्रकारे एक्स्ट्रा पैशांपर्यंत ती पोहोचली होती. चोरीच्या या केसमध्ये आधीच तीन अटक झाल्या आहेत. आता इनेसाला सुनावणीसाठी रशियात आणलं आहे.